शहरं
Join us  
Trending Stories
1
निकालाच्या भविष्यवाणीवर प्रशांत किशोर-योगेंद्र यादवांमध्ये चढाओढ; भाजपाला किती जागा?
2
बड्यांच्या मुलांनी ‘रेस’मध्ये माझं अख्खं कुटुंबच चिरडलं, तरुणाचा आक्रोश; १५ दिवस झाले, कोणालाच अटक नाही
3
"त्याला बोट धरुन शिवसेनेत आणलं नाही, मुलासोबत टर्निंग पॉईंटला नव्हतो याची खंत"; गजानन किर्तीकर थेटच बोलले
4
'लेडी लक'ची चमक! पत्नी एलिसा स्टेडियममध्ये आली अन् मिचेल स्टार्कने मैदानावर कमाल केली...
5
"एवढा आत्मविश्वास कुठून येतो"; उद्धव ठाकरेंच्या आरोपांवरुन राष्ट्रवादीची बोचरी टीका
6
Astro Tips: कासवाकृती अंगठीचा वापर लाभदायी, पण कोणत्या बोटात घालायची ते जाणून घ्या!
7
SEBI चा नवा नियम, आता ६ महिन्यांच्या सरासरीवरून ठरणार लिस्टेड कंपन्यांचं Market Cap
8
Mrunal Dusanis : "नीरजसारखा मुलगा आल्यावर मला वाटलं की..."; मृणाल दुसानिसने सांगितला 'तो' किस्सा
9
“आदित्य ठाकरेंना CM करण्यासाठी रश्मी ठाकरेंचा आग्रह होता, पण शरद पवारांनी नकार दिला”
10
‘त्या’ने जिथे दारू प्यायली, त्या चोरडियांच्या ब्लॅक हॉटेलला टाळे; पंचशील इन्फ्रास्ट्रक्चरचे चोरडिया यांच्या नावाने आहे परवाना
11
Gold Price Today: सोन्याच्या तेजीला ब्रेक, चांदीही घसरली; पाहा २२ मे रोजी किती घसरला भाव
12
MS Dhoni ची मोठी घोषणा! चाहतेही पडले संभ्रमात; लवकरच दिसणार नव्या भूमिकेत
13
"हा नवा भारत घरात घुसून मारतो, पण आम्ही..."; मोदींच्या भाषणाचा उल्लेख करत पाकिस्तानी राजदूताची धमकी
14
KKR vs SRH : ...अन् शाहरूख खानला मागावी लागली माफी; नेमकं काय घडलं, पाहा Video
15
ज्या आजोबांनी बाळाची हमी दिली, त्यांचे छोटा राजनशी कनेक्शन; भावाशी संपत्तीवरून वाद, मित्रावर गोळीबार
16
'बिल्डर लॉबी भाजपसाठी काम करते, पुण्यात येऊन फडणवीसांचा दिखावा'; रवींद्र धंगेकरांचा आरोप
17
ऐन निवडणुकीत प्रमुख नेत्यांना मारण्याचा कट; अटक केलेल्या युवकाचे पाकिस्तानशी कनेक्शन
18
“मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा फटका बसला, राज्यात महायुतीला...”: महादेव जानकर
19
'मातोश्रीवर लोटांगण घालण्याची घाई'; गजानन कीर्तिकरांच्या हकालपट्टीसाठी शिवसेना नेत्याचे मुख्यमंत्र्यांना पत्र
20
Swati Maliwal : "काल पक्षाच्या एका मोठ्या नेत्याचा फोन आला अन्..."; स्वाती मालीवाल यांचा गंभीर आरोप

साताऱ्यात जोरदार, जिल्ह्याच्या पश्चिम भागात धो-धो !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 1:09 PM

Rain Satara : सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढला असून बुधवारी रात्रीपासून धो-धो सुरू आहे. यामुळे धरणातील पाणीसाठा वेगाने वाढू लागला आहे. तर कोयना धरणात दिवसांत जवळपास ३ टीएमसी पाणीसाठा वाढला. त्याचबरोबर साताऱ्यातही गुरुवारी दिवसभर जोरदार पाऊस होता. या पावसामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी वाहतुकीस अडथळा आला. तर तापोळा-महाबळेश्वर रस्त्यावर दरड कोसळल्याने वाहतूक बंद झाली होती.

ठळक मुद्देकोयनेत ३ टीएमसी पाणी वाढले रस्त्यावर दरडी कोसळल्या, वाहतुकीवर परिणाम

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढला असून बुधवारी रात्रीपासून धो-धो सुरू आहे. यामुळे धरणातील पाणीसाठा वेगाने वाढू लागला आहे. तर कोयना धरणात दिवसांत जवळपास ३ टीएमसी पाणीसाठा वाढला. त्याचबरोबर साताऱ्यातही गुरुवारी दिवसभर जोरदार पाऊस होता. या पावसामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी वाहतुकीस अडथळा आला. तर तापोळा-महाबळेश्वर रस्त्यावर दरड कोसळल्याने वाहतूक बंद झाली होती.जिल्ह्यात तीन दिवसांपासून पावसाने जोर धरण्यास सुरूवात केली आहे. मंगळवारी सायंकाळपासून पश्चिम भागात सारखा पाऊस कोसळत आहे. बुधवारीही दमदार पाऊस झाला. तर सायंकाळपासून धो-धो पाऊस पडत आहे. पश्चिम भागातील कास, बामणोली, तापोळा, महाबळेश्वर, कोयना या भागात पावसाने उसंतच दिली नाही. त्यातच धरण परिसरातही जोरदार पाऊस होत आहे. यामुळे धरणातील पाणीसाठ्यात वेगाने वाढ होण्यास सुरुवात झाली आहे.

कोयना धरण परिसरात दोन दिवसांपासून जोर आहे. गुरूवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत २५१ मिलीमीटर पाऊस पडला. तर धरणात २१६७२ क्यूसेक वेगाने पाणी येत आहे. धरणातील पाणीसाठा ३१.६७ टीएमसी झाला. तर बुधवार सकाळपासून जवळपास ३ टीएमसीने पाणीसाठा वाढला आहे.दरम्यान, कऱ्हाड तालुक्यालाही पावसाने झोडपले. मलकापूरसह परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. यामुळे गोटे गावच्या हद्दीत व मलकापूर परिसरात महामार्गावर पाणी आल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती. पाटण तालुक्यातील चाफळ विभागात दाढोली-महाबळवाडी दरम्यानच घाट रस्ता पहिल्याच पावसात खचून गेला. तसेच मोरीपूल वाहून गेल्याने वाहतूक पूर्णपणे बंद पडली.कऱ्हाडला ९८ तर महाबळेश्वरला १४३ मिलीमीटर पाऊसाची नोंदजिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस सुरूच आहे. बुधवारपासून गुरूवारी सकाळी १० वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी ४६.८ मिलीमीटर पाऊस पडला. तर आतापर्यंत सरासरी १४३.२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गुरूवारी सकाळी १० वाजेपर्यंत झालेल्या पावसाची तालुकानिहाय माहिती आणि कंसात आतापर्यंत झालेल्या एकूण पावसाची आकडेवारी मिलीमीटरमध्ये अशी आहे.

सातारा - ४० (१४६.६), जावळी - ८०.१ (२३०.९), पाटण -८२.३ (१७०.३), कऱ्हाड - ९८.९ (२०३.७), कोरेगाव - २०.४ (१०४.४), खटाव - १५.१ (७८), माण - ४.६ (५७.२), फलटण - २.८ (६४.१), खंडाळा - ६.८ (७७.५) , वाई - १८.७ (१२८.४), महाबळेश्वर - १४३ (३८९).

टॅग्स :RainपाऊसSatara areaसातारा परिसर