सातारा : येथील न्यू इंग्लिश स्कुलमध्ये शिक्षकाला पालकाने मारहाण केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी घडली. या घटनेचा निषेध करत शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन करत मारहाण करणाऱ्या पालकाच्या अटकेची मागणी केली आहे.न्यू इंग्लिश स्कुलमध्ये शाळेत वर्ग सुरू असताना एका पालकाने येऊन शिक्षक विजय गुरव यांना मंगळवारी मारहाण केली होती. वर्गात शिक्षकांची नक्कल केली म्हणून काही विद्यार्थ्यांना पालकांना आणण्याचे शिक्षकांनी सांगितले होते. त्यानुसार आलेल्या पालकांची शिक्षकांबरोबर बाचाबाची झाली यातून त्यांनी शिक्षक गुरव यांना मारहाण केल्याची माहिती पोलिसांत देण्यात आली होती. दरम्यान, ही माहिती आणि तक्रार देऊनही पालकांवर साधी प्रतिबंधात्मक कारवाइही पण न झाल्याने शिक्षक कर्मचारी संतापले. पोलीस प्रशासनाचा निषेध म्हणून शिक्षक व कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन करून आपला निषेध व्यक्त केला.
Satara: मारहाण प्रकरणी शिक्षकांचे काम बंद आंदोलन
By प्रगती पाटील | Updated: October 18, 2023 15:59 IST