शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षणासाठी सातारा जिल्ह्यात कडकडीत बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2023 13:32 IST

राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन ग्रामपंचायत सदस्यांनी राजीनामे दिले

सातारा : मराठा आरक्षणासाठी क्रांती मोर्चाने दिलेल्या सातारा जिल्हा बंदच्या हाकेला मंगळवारी जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कडकडीत बंद पाळण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेकडो आंदोलकांनी जोरदार घोषणा, टाळमृदुंगाच्या गजरात भजन गात परिसर दणाणून साेडला. गोंदवले येथे एका एसटीवर अज्ञातांनी दगडफेक केली. यामुळे दहिवडी आगारातील एसटी फेऱ्या काही काळ बंद केल्या होत्या.मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बेमुदत साखळी उपाेषणाच्या पाचव्या दिवशी शेकडो आंदोलकांनी दिलेल्या घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय दणाणून गेले. राजकीय नेत्यांनी मराठा आंदोलकांच्या मंडपात येण्यापेक्षा मुंबईला विधिमंडळात जावे, विशेष अधिवेशन बोलावून आरक्षण द्यावे, अशी मागणी आंदोलकांनी केली. सातारा शहरातून शेकडो आंदोलकांनी दुचाकी रॅली काढली. यावेळी जिल्ह्यात सुमारे साडेपाचशे गावांमध्ये नेत्यांना गावबंदी करण्यात आल्याचे आंदोलकांनी सांगितले.फलटणमध्येही कडकडीत बंद पाळण्यात आला. राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसस्थानकात शुकशुकाट जाणवत होता. दरम्यान, मंगळवारी सात उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.कोरेगाव तालुक्यातील आर्वी येथे शासनाच्या धोरणाचा निषेध करीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन ग्रामपंचायत सदस्यांनी मंगळवारी राजीनामे सरपंच वनिता राऊत यांच्याकडे सुपूर्द केले आहेत.जावली तालुक्यातील मेढा, कुडाळ, केळघर, करहर, आनेवाडी बाजारपेठेतील दुकाने बंद ठेवण्यात आली होती. बाजारपेठेत सगळीकडे शुकशुकाट दिसत होता. मेढा येथे मराठा बांधवांनी साखळी उपोषण सुरू केले आहे.खंडाळा तालुक्यात शिरवळ, शिदेंवाडी, पळशी, भादे, भोळी आदी विविध ठिकाणी अत्यावश्यक सेवा वगळता बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बंदमुळे खटाव बाजारपेठेतही शुकशुकाट हाेता.शासकीय कार्यालयातही वर्दळ कमीसातारा शहरातील विविध शासकीय विभागांच्या कार्यालयात अधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी तसेच मागण्यांसाठी येणाऱ्या लोकांची वर्दळ कमी होती. मंगळवारी जिल्हा बंद असल्याने शासकीय कार्यालयात कामासाठी आलेले लोक तुरळक प्रमाणातच दिसत होते.

परीक्षेवरच बहिष्कारसंपूर्ण माण तालुक्यात अत्यावश्यक सेवावगळता कडकडीत बंद पाळण्यात आला. गोंदवले येथे उभ्या असलेल्या गाडीवर रात्री दगडफेक करण्यात आली. तर, दहिवडी येथील महात्मा गांधी शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रवेशद्वारावर आंदोलन केले. आरक्षण नाही तर शाळा नाही म्हणत परीक्षेवरच बहिष्कार टाकला.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरMaratha Reservationमराठा आरक्षण