शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
3
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
4
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
5
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
6
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
7
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
8
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
9
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
10
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
11
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
12
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
13
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
14
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
15
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
16
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
17
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
18
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
19
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
20
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत

स्ट्रॉबेरी मस्त पण जीवाची धास्त, महामार्गावरच दुकान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2020 19:18 IST

वेळे /सातारा : पुणे ते सातारा या महामार्गावर कवठे ते भुईंज या दरम्यान अनेक स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी व किरकोळ व्यापारी ...

ठळक मुद्देस्ट्रॉबेरी मस्त पण जीवाची धास्तमहामार्गावरच दुकान

वेळे /सातारा : पुणे ते सातारा या महामार्गावर कवठे ते भुईंज या दरम्यान अनेक स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी व किरकोळ व्यापारी यांनी स्ट्रॉबेरी विक्रीच्या नावाखाली महामार्गावरच आपले दुकान थाटून व्यवसायाची थट्टा चालवली आहे. सेवा रस्ता व महामार्ग यांच्या मधल्या जागेत राजरोसपणे बिन भाड्याच्या जागेत हा धंदा अनेक वर्षांपासून चालू आहे. मात्र या अशा धद्यांमुळे महामार्गावरून प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांना व वाहन धारकांना जीवाची जोखीम पत्करून प्रवास करावा लागत आहे.कवठे ते भुईंज दरम्यानच्या रस्त्यालगत अनेक शेतकरी स्ट्रॉबेरी पिकाचे उत्पादन घेतात. मात्र ती विकण्यासाठी त्यांनी महामार्गावरच आपला स्वतंत्र असा अड्डा निर्माण केला आहे. या शेतकऱ्यांबरोबरच किरकोळ विक्री करणारे व्यापारीही हा धंदा करीत आहेत.

जवळपास शेकडोजण आपल्या जीवासह इतरांच्या जीवाशी खेळत हा धंदा अगदी सहजतेने करीत आहेत. त्यांना ना पोलीस प्रशासनाची धास्ती ना महामार्ग प्राधिकरणाची. स्ट्रॉबेरीची चव अगदीच मस्त असली तरी ती विकणारे व विकत घेणार यांना जीवाची धास्त राहिलेली नाही, असेच दिसून येते.राष्ट्रीय महामार्गावर कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होवू नये, अशी प्रशासनाची भूमिका असताना देखील या ठिकाणी मात्र अडथळ्यांचा सामना हा रोजच्या वाहन धारकांना व प्रवाशांना होताना दिसत आहे. हे स्ट्रॉबेरी विक्रेते आपला माल विकून चरितार्थ चालवितात, मात्र अशा वेळी काही अघटीत घटना घडली तर तर त्यास हे जबाबदार राहतील का? कवठे ते भुईंज या दरम्यानचा महामार्ग हा चढ व उताराने बनलेला आहे.

अशा वेळी एखादे वाहन ही स्ट्रॉबेरी विकत घेण्यासाठी थांबले असता पाठीमागून येणाऱ्या वाहनाला अंदाज आला नाही तर या ठिकाणी भयंकर अपघाताची शक्यता कोणीही नाकारू शकत नाही. अशा परिस्थितीत चूक नक्की कोणाची? स्ट्रॉबेरी विकणाऱ्यांची की विकत घेणाऱ्यांची? मग याला जबाबदार कोण? असे एक ना अनेक सवाल काळजाला भिडत जातात.सेवा रस्ते व महामार्ग ही राष्ट्रीय संपत्ती असून त्यावर कोणीही आपली हुकूमत गाजवू नये. याचा नाहक त्रास इतरांना होतो. आपले जे काही उत्पादन विक्रीसाठी ठेवायचे असेल ते कोणालाही त्रास होणार नाही अशा ठिकाणी ठेवावे. स्ट्रॉबेरी उत्पादनासाठी भरपूर खर्च येतो. ती विकुनच शेतकरी आपला खर्च भागवतो. मात्र ती विकण्याची जागा ही महामार्ग न्हवे, हेही लक्षात घेतले पाहिजे.आता या महामार्गावरील विक्रेत्यांसंदर्भात राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडून समज दिली जाते की त्यांचेवर कोणती कारवाई केली जाते हे पाहणे गरजेचे आहे. तसेच महामार्ग पोलीस याकडे कोणत्या नजरेने पाहतात हे देखील अत्यंत महत्वाचे आहे. 

टॅग्स :highwayमहामार्गSatara areaसातारा परिसर