सातारा : युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या स्वयंपाक गॅसच्या टंचाईमुळे सर्वसामान्य नागरिक तसेच व्यावसायिक प्रचंड हैराण झाले आहेत. यावर जिल्हा प्रशासनाने लवकरात लवकर तोडगा काढावा, अशी मागणी करत महाविकास आघाडीने दि. १३ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच चुली मांडून अनोखे आंदोलन केले. यावेळी गॅस पुरवठा सुरळीत करावा आणि काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. दरम्यान, सातारा शहर महाविकास आघाडीच्या वतीने मुख्यमंत्री यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन देण्यात आले.सध्या शहरात घरगुती गॅस सिलिंडरचा पुरवठा विस्कळीत झाल्याने सर्वसामान्य नागरिक, गृहिणी तसेच छोटे व्यावसायिक यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. चहा-नाष्टा केंद्र, हॉटेल, बेकरी तसेच गॅसवर चालणारे लघुउद्योग यावरही या टंचाईचा परिणाम होत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांसमोरील या अडचणीकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाविकास आघाडीचे शहर समन्वयक सुनील काळेकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.
यावेळी राहुल पवार, सचिन बागल, मनीषा सांळुखे, सादिकअली बागवान, प्रणव सावंत, गणेश अहीवळे, अस्लम तडसकर, विजय निकम, सुवर्णा पाटील, समिंद्रा जाधव, संजना जगदाळे, सुषमा घोरपडे, तेजस्विनी केसरकर, अर्चना देशमुख, नलिनी जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते.
आंदोलकांनी या मागण्याजिल्हा व शहर पातळीवर गॅस पुरवठा नियमित करण्यात यावा, टंचाईचा गैरफायदा घेऊन काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, स्थानिक पातळीवर इंधन पुरवठा व्यवस्थापन व तक्रार निवारण समितीच्या बैठकांद्वारे समस्या सोडवाव्यात, जनतेच्या अडचणींची तातडीने दखल घेऊन शासनाने उपाययोजना कराव्यात आदी मागण्या करण्यात आल्या असून दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.
Web Summary : Maha Vikas Aghadi protested gas shortage in Satara by cooking on chulhas outside the Collector's office. They demanded regular gas supply and strict action against black marketing, submitting a memorandum to the Chief Minister.
Web Summary : महा विकास अघाड़ी ने सतारा में गैस की कमी के खिलाफ कलेक्टर कार्यालय के बाहर चूल्हे जलाकर विरोध प्रदर्शन किया। उन्होंने गैस की नियमित आपूर्ति और कालाबाजारी करने वालों के खिलाफ सख्त कार्रवाई की मांग की, मुख्यमंत्री को ज्ञापन सौंपा।