पुसुनी झिंगाटाची कहाणी... ...केली मजुरांची तपासणी !--नववर्षाची शुभवार्ता...उंब्रजमधील युवकांनी जपली सामाजिक बांधिलकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 23:59 IST2018-01-01T23:59:12+5:302018-01-01T23:59:46+5:30
उंब्रज : जुन्या वर्षाला बाय-बाय करत नवीन वर्षाच्या स्वागत करण्यात प्रत्येकजण मग्न असतो. परंतु उंब्रज येथील काही युवकांनी नववर्षाला केल्या जाणाºया झिंगाटासह सर्वच

पुसुनी झिंगाटाची कहाणी... ...केली मजुरांची तपासणी !--नववर्षाची शुभवार्ता...उंब्रजमधील युवकांनी जपली सामाजिक बांधिलकी
उंब्रज : जुन्या वर्षाला बाय-बाय करत नवीन वर्षाच्या स्वागत करण्यात प्रत्येकजण मग्न असतो. परंतु उंब्रज येथील काही युवकांनी नववर्षाला केल्या जाणाºया झिंगाटासह सर्वच गोष्टींना फाटा देत ऊसतोड करणाºया मजुरांना रक्त तपासणीचे महत्त्व सांगून महिला व पुरुषांची मोफत हिमोग्लोबीन व सीबीसी तपासणी केली. तसेच या अनोख्या उपक्रमाने सरत्या वर्षाला निरोप देण्याचा एक नवीन पायंडा सुरू केला.
येथील काही तरुणांनी एकत्र येऊन स्वराज्य शैक्षणिक व सामाजिक विकास संस्थेची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून गरजू लोकांसाठी मोफत आरोग्य शिबिर, मोतिबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर, दुर्गम भागतील शालेय विद्यार्थ्यांसाठी मोफत रक्तगट तपासणी शिबिर असे विविध उपक्रम मोफत राबवले जातात. तसेच या शिबिराच्या माध्यमातून या युवकांनी आतापर्यंत हजारो विध्यार्थ्यांचे रक्तगट तपासणी करून त्यांची संग्रहीत स्वरुपात नोंदही ठेवली आहे.
थर्टी फस्ट वेगळ्याच पद्धतीने साजरा करायचा हे ठरवून अमोल पवार, शिवाजी जाधव, पंकज जाधव, शिवप्रसाद गोरे, उदय लाटे, विनायक पाटेकर हे एकत्र आले. या सर्वांनी मिळून जुन्या वर्षाला निरोप देताना एक नवा सामाजिक पायंडा पाडण्याचा निर्णय घेतला. हा दिवस ऊसतोड कामगारांसोबत वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचे ठरवले.
ऊस तोडणीचे काम करीत असताना ऊसतोड कामगार व त्यांच्या मुलांची प्रकृती खालावते. त्यांना अनेमियासारखे आजार होतात. महिलांमध्येही रक्ततपासणी व उपाय यांच्याविषयी माहितीच नसते. यामुळे एकत्र आलेल्या तरुणांनी ऊसतोड करणाºया कर्मचाºयांची हिमोग्लोबीन तसेच सीबीसी याची मोफत तपासणी करून त्यांना याविषयी मार्गदर्शन केले. तरुणांच्या या अनोख्या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
थर्टी फस्टला अनेकजण पार्ट्या करतात. व्यसन करतात. नवीन वर्षाचे स्वागत करतात. यात हजारो रुपयांचा चुराडाही करतात. आम्ही अशा पद्धतीने पैसे खर्च न करता ऊसतोडणी मजुरांसाठी आरोग्य शिबिर राबवून थर्टी फस्ट साजरा केला. ज्यांच्या पुढील उपचाराची गरज आहे, अशा व्यक्तींची तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करून त्यांना मोफत औषधोपचार करणार आहे. हा उपक्रम वर्षभर सुरू राहणार आहे.
- अमोल पवार
उंब्रज येथील स्वराज्य शैक्षणिक व सामाजिक विकास संस्थेच्या वतीने ऊसतोड मजुरांच्या मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले.