मद्यपी टँकरचालकाला वेळीच रोखल्याने अनर्थ टळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:10 IST2021-02-05T09:10:48+5:302021-02-05T09:10:48+5:30
सातारा : समर्थ मंदिर येथे रविवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास दुधाचा टँकरचालक दारूच्या नशेत टँकर चालवीत असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास ...

मद्यपी टँकरचालकाला वेळीच रोखल्याने अनर्थ टळला
सातारा : समर्थ मंदिर येथे रविवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास दुधाचा टँकरचालक दारूच्या नशेत टँकर चालवीत असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास येताच त्याला नागरिकांनी खाली उतरवताच तो रस्त्याकडेला दारूच्या नशेत तर्र होऊन पडला. हळूहळू याची माहिती मिळताच नागरिक जमा होऊ लागले. त्यातील काही तरुणांनी गोंधळ घालत पाच-सहा वाहनांना धडक दिल्याचे सांगितले.
याबाबत अधिक माहिती अशी, रविवारी दुपारी समर्थ मंदिर परिसरात दुधाचा टँकर चालक दारू पिऊन चालवीत असल्याचे काही नागरिकांच्या निदर्शनास आले. त्याला अडवून नागरिकांनी केबिनमधून खाली उतरविले. तो चालक रस्त्याकडेलाच दारूच्या नशेत तर्र होऊन पडला. टँकर चौकात उभा केला. हळूहळू याची माहिती त्या परिसरातील नागरिकांना मिळताच नागरिक जमा होऊ लागले. काही जण पोवई नाक्यापासून हा टँकर चालक दहा गाड्या उडवीत आल्याचे सांगू लागले. शाहूपुरी पोलिसांना याची माहिती मिळताच शाहूपुरी पोलीसही घटनास्थळी पोहोचले, तसेच पीसीआरची दोन महिला पोलीस आणि होमगार्ड असलेली जीपही तेथे पोहोचली. टँकरचालक रस्त्याकडेला पडला होता. त्याच टँकर चालकाचे व्हिडिओ शूटिंग केले.
दरम्यान, त्या चालकाला दारूच्या नशेत रस्त्यावरच गाढ निद्रा लागली होती. नागरिकांनी वेळीच त्याला केबिनमधून बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला. शाहूपुरी पोलिसांनी मात्र केवळ एका गाडीला टँकरचा धक्का लागला आहे, असे सांगितले.