‘स्वाभिमानी’चे सोमंथळी येथे रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:36 IST2021-02-07T04:36:47+5:302021-02-07T04:36:47+5:30
फलटण : कृषी कायदे रद्द करावेत, या मागणीसाठी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा आणि शेतीपंप व घरगुती वीज ...

‘स्वाभिमानी’चे सोमंथळी येथे रास्ता रोको
फलटण : कृषी कायदे रद्द करावेत, या मागणीसाठी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा आणि शेतीपंप व घरगुती वीज बिल माफ करावे, या मागण्यांसाठी फलटण-बारामती रस्त्यावर सोमंथळी (ता. फलटण) येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून रास्ता रोको आंदोलन छेडण्यात आले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक, माजी खासदार राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संघटनेचे जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आल्याचे तालुकाध्यक्ष नितीन यादव व त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगितले.
शेती व शेतकऱ्यांसाठी नवे कृषी कायदे फायदेशीर नसल्याने त्याविरुद्ध दिल्लीत शेतकरी रस्त्यावर उतरले असून, थंडीची पर्वा न करता त्यांनी आंदोलन सुरू ठेवले असून, शासन त्याची दाद घेत नसल्याने आता हे आंदोलन देशभर सुरू करावे लागणार असून, त्याचाच एक भाग म्हणून सोमंथळी येथे रास्ता रोको आंदोलनाद्वारे शासनाचे शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.
या आंदोलनात प्रामुख्याने शेतकरी संघटनेचे डॉ. रवींद्र घाडगे, नितीन यादव, सचिन खानविलकर, सुभाष जाधव, प्रमोद गाडे, दादा जाधव, अक्षय चव्हाण, बाळासाहेब शिपकुले, प्रल्हाद अहिवळे, शिवाजी सोडमिसे, अक्षय लोंढे, रोहन मोहिते, रोहन चव्हाण आदी तसेच महिलाही उपस्थित होत्या.
०६फलटण
सोमंथळी (ता. फलटण) येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.