वसुली थांबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:23 IST2021-09-02T05:23:02+5:302021-09-02T05:23:02+5:30

प्रेमीयुगुलांचा वावर सातारा : पर्यटकांचा आणि इतिहासप्रेमींचे आवडीचे ठिकाण असलेला चारभिंती परिसरात सध्या प्रेमीयुगुलांचा वावर वाढला आहे. विशेष म्हणजे ...

Stop recovery | वसुली थांबवा

वसुली थांबवा

प्रेमीयुगुलांचा वावर

सातारा : पर्यटकांचा आणि इतिहासप्रेमींचे आवडीचे ठिकाण असलेला चारभिंती परिसरात सध्या प्रेमीयुगुलांचा वावर वाढला आहे. विशेष म्हणजे येथे असलेल्या पायऱ्या, बसायला केलेले कट्टे, बाकडी यांची चोरी झाल्याचेही दिसत आहे.

कृषीकन्येकडून मार्गदर्शन

सातारा : अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे जनावरांना विविध आजारांची लागण होत असते. आजाराने ग्रासलेल्या जनावरांची काळजी कशी घ्यावी, तसेच त्यांच्या लसीकरणाबाबत कृषिकन्या निकिता पवार हिने मार्गदर्शन केले.

कॉलेज बहरले

सातारा : जिल्ह्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीच्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रवेश देण्यात येत आहेत. त्यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून ओस पडलेला कॉलेज कॅम्पस पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या वर्दळीने बहरून गेला आहे.

मोफत कार्यशाळा

सातारा : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने २०१९ मध्ये घेतलेल्या पशुधन विकास अधिकारी पशुसंवर्धन अधिकारी गट अ मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. यात पात्र उमेदवारांसाठी साताऱ्यात यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट येथे मोफत मुलाखत तंत्र मार्गदर्शन कार्यशाळेचे ६ सप्टेंबरला आयोजन करण्यात आले आहे.

Web Title: Stop recovery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.