पोटाच्या खळगीनं ‘त्याला’ दाखवला कामाचा मार्ग!

By Admin | Updated: August 14, 2014 22:37 IST2014-08-14T21:09:53+5:302014-08-14T22:37:51+5:30

सातारा पालिका : मनोरुग्ण करतोय मनापासून काम

The stomach exposed his 'work' to work! | पोटाच्या खळगीनं ‘त्याला’ दाखवला कामाचा मार्ग!

पोटाच्या खळगीनं ‘त्याला’ दाखवला कामाचा मार्ग!

सातारा : पालिकेचे राजवाड्यावरील जुन्या अग्निशामक कार्यालय ते मोती तळ्याजवळील नवीन अग्निशामक कार्यालयातील कार्यालयीन नोंदवहीची कामे चक्क मनोरुग्ण व्यक्ती करत आहे. एखाद्या नवख्याने हा प्रकार पाहिला तर तो कार्यालयातून नोंदवही पळवत आहे काय?, असाच प्रश्न पडतो; परंतु हा मनोरुग्ण पोटाची खळगी भरण्यासाठी या नोंदवहीची देवाणघेवाण करत आहे.
राजवाड्यावर पालिकेचे जुने अग्निशमनदलाचे कार्यालय व नवीन कार्यालय जवळपास २00 मिटरचे अंतर आहे. या कार्यालयात नोंदवही तसेच इतर स्टेशनरी साहित्यांची देवाणघेवाण या दोन्ही कार्यालयांतून होते. चक्क एक मनोरुग्ण हे काम करत आहे. संबंधित मनोरुग्ण व्यक्ती कुणाशी बोलत नाही. तो एका कार्यालयातून चालत सरळ जातो व दुसऱ्या कार्यालयात जातो. मनात आले तरच काम करतो. या कामासाठी त्याला अनेकजण जेवायला काही पैसे देतात. राजवाडा चौपाटीवर खाऊन पुन्हा तो आपल्या कामाला लागतो. कोणत्याही दिवशी हा व्यक्ती याठिकाणी येतो व ही कामे व्यवस्थित पार पाडतो. दरम्यान, मनोरुग्ण व्यक्ती हे शांतपणाने एकाच कामात मग्न असतात; परंतु एखादी गोष्ट त्यांच्या मनाविरुध्द झाली तर त्याचा नेहमीच्या कामातही अडथळा निर्माण होतो. (प्रतिनिधी)

कष्टाशिवाय पोटाला काही मिळूच शकत नाही. याची साक्षच जणू त्याला पटली असल्यानं तो हे काम करतो. या कामातून त्याला चार पैसे मिळतात अन पोटाची खळगी भरतात.

Web Title: The stomach exposed his 'work' to work!