साताऱ्यात आठ आलिशान कारमधील टेप चोरीस
By Admin | Updated: June 24, 2017 13:05 IST2017-06-24T13:05:45+5:302017-06-24T13:05:45+5:30
घटनास्थळी धाव घेत पोलिसांकडून पंचनामा

साताऱ्यात आठ आलिशान कारमधील टेप चोरीस
आॅनलाईन लोकमत
सातारा , दि. २४ : शहरात गुरूवारी मध्यरात्री चोरट्यांनी धुमाकूळ घालून आठ आलिशान कारमधील महागडे टेप चोरून नेले. हा प्रकार शुक्रवारी सकाळी उघडकीस आला.
समर्थ मंदिर येथील कदम यांची स्वीफ्ट कार तसेच शनिवार पेठमध्ये सात इनोव्हा कारमधून चोरट्यांनी टेप लांबविले. पुढील बाजुची काच फोडून चोरट्यांनी हे कृत्य केले आहे. चोरीची पद्धत एकच असल्यामुळे यामध्ये स्थानिक तसेच माहितगार टोळी असल्याचा पोलिसांना संशय आहे.
समर्थ मंदिर येथे एका सीसीटीव्हीमध्ये चोरटे कैद झाली असण्याची शक्यता असून पोलिसांनी हे सीसीटीव्ही फुटेज मिळण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.