कालगावात दारूचा साठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:38 IST2021-04-13T04:38:02+5:302021-04-13T04:38:02+5:30

धीरज शंकर पवार (वय २३, रा. कालगाव) व तानाजी बाबूराव हावळे (४१, रा. हावळेवाडी, ता. पाटण) अशी गुन्हा दाखल ...

Stocks of liquor seized in Kalgaon | कालगावात दारूचा साठा जप्त

कालगावात दारूचा साठा जप्त

धीरज शंकर पवार (वय २३, रा. कालगाव) व तानाजी बाबूराव हावळे (४१, रा. हावळेवाडी, ता. पाटण) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कालगाव येथे प्रवीण पवार यांच्या घराच्या आडोशाला तानाजी हावळे हा अवैध दारूविक्री करीत असून, त्याने दारू साठा केल्याची माहिती उंब्रजचे सहाय पोलीस निरीक्षक अजय गोरड यांना मिळाली. या माहितीनुसार उंब्रज पोलीस ठाण्याच्या पथकाने त्याठिकाणी छापा टाकला असता, तानाजी हावळे हा दारू विक्री करीत असताना आढळून आला. तसेच त्याठिकाणी १ लाख ७४ हजार ७२० रुपये किमतीचे देशी दारूचे ७० बॉक्स मिळून आले. पोलिसांनी ते जप्त केले. धीरज पवार याने हा साठा केल्याची माहिती तपासातून निष्पन्न झाली. त्यावरून दोघांवरही गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सहायक फौजदार भोसले तपास करीत आहेत.

Web Title: Stocks of liquor seized in Kalgaon