नीरा-कृष्णा खोऱ्यातील धरणांची स्थिती चिंताजनक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2019 23:02 IST2019-04-28T23:02:49+5:302019-04-28T23:02:54+5:30

दशरथ ननावरे । लोकमत न्यूज नेटवर्क खंडाळा : सातारा जिल्ह्यातील प्रमुख धरणांचा पाणीसाठा दिवसेंदिवस पाणी कमी होत आहे. पाण्याच्या ...

Status of dams in the Neera-Krishna valley are worrisome | नीरा-कृष्णा खोऱ्यातील धरणांची स्थिती चिंताजनक

नीरा-कृष्णा खोऱ्यातील धरणांची स्थिती चिंताजनक

दशरथ ननावरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
खंडाळा : सातारा जिल्ह्यातील प्रमुख धरणांचा पाणीसाठा दिवसेंदिवस पाणी कमी होत आहे. पाण्याच्या भीषण टंचाईला सर्वसामान्य जनतेला सामोरे जावे लागणार आहे. मागील वर्षाच्या तुलनेत जिल्ह्यातील कृष्णा व नीरा खोºयातील धरणाचा पाणीसाठा तीस टक्क्यांच्या खाली आल्याने स्थिती चिंताजनक बनली आहे. त्यामुळे पावसाळा सुरू होईपर्यंत पाणीवापराचे योग्य नियोजन करणे गरजेचे बनले आहे.
नीरा व कृष्णा खोºयातील धरणांच्या पाणीसाठ्याचा मागील चार महिन्यांत अनिर्बंध उपसा झाला आहे. त्यामुळे एप्रिलच्या मध्यावरच पाणीसाठ्यात कमालीची घट झाली आहे. त्यामुळे पाण्याचे दुर्भिक्ष जाणवू लागले आहे. गेल्या नीरा खोºयातील नीरा देवधर, भाटघर व वीर या तिन्ही धरणांतील पाणीसाठा साठ टक्क्यांपेक्षा जास्त होता. या तुलनेत यावर्षी नीरा खोºयातील नीरा देवधर १३ .८१ टक्के, भाटघर १९.१७ टक्के व वीर धरणात केवळ ५०.०६ टक्के एवढाच पाणीसाठा आहे. तर कृष्णा खोºयातील कोयना धरणात ४५.०१ टक्के, धोम १४.७४ टक्के, कण्हेर ३४.७२ टक्के, धोम-बलकवडी २०.९२ टक्के, उरमोडी २५.२२ टक्के तर तारळी धरणात ४६.३७ टक्के एवढेच पाणी शिल्लक आहे.
यावर्षी तापमान ४० अंशांच्या जवळपास आहे. पाण्याचे बाष्पीभवन अधिक प्रमाणात होत आहे. त्यामुळे पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. यावर्षी टंचाईसदृश स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांनी पाणी जपून वापरावे तसेच सूक्ष्म सिंचनाचा जास्तीत-जास्त वापर करून पाणी काटकसरीने वापरावे. त्याचबरोबर अनधिकृत पाणी उपसा न करता सहकार्य करावे, असे आवाहन जलसंपदा विभागाच्यावतीने करण्यात आला आहे.
बळीराजा हवालदिल
नीरा खोºयातील धरणाच्या पाण्याचा उपयोग सातारा जिल्ह्यातील खंडाळा, फलटण तालुक्यांसह सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, पंढरपूर, सांगोला तसेच पुणे जिल्ह्यातील पुरंदर, बारामती ते इंदापूरपर्यंत होत असतो. येथील शेती याच पाण्यावर अवलंबून असते. सातारा, सोलापूर जिल्ह्यांतील खंडाळा, फलटण, माळशिरस, पंढरपूर, सांगोला तालुक्यांत यावर्षी सरासरीपेक्षा खूपच पाऊस कमी झाल्याने टंचाईसदृश परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे. पावसाअभावी यंदा शेतीचा हंगामही अत्यल्प उत्पादनाचा झाला आहे. उन्हामुळे पाण्याची गंभीर स्थिती यावर्षी दिसू लागल्याने बळीराजा हवालदिल झालेला पाहावयास मिळत आहे.

Web Title: Status of dams in the Neera-Krishna valley are worrisome

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.