संजयनगर ग्रामपंचायतीचे रेल्वे विभागाला निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:44 IST2021-08-20T04:44:49+5:302021-08-20T04:44:49+5:30
यावेळी संजयनगरचे उपसरपंच सर्जेराव मदने, सदस्या मनीषा सातपुते, सदस्य पोपट मदने, सुनीता सातपुते सुनील मंडले, सुरज गुजर, विनोद बोडरे, ...

संजयनगर ग्रामपंचायतीचे रेल्वे विभागाला निवेदन
यावेळी संजयनगरचे उपसरपंच सर्जेराव मदने, सदस्या मनीषा सातपुते, सदस्य पोपट मदने, सुनीता सातपुते सुनील मंडले, सुरज गुजर, विनोद बोडरे, व संतोष सातपुते उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की, १९७७ साली भूमिहीन शेतमजूर लोकांना घरकुलांचा कब्जा देण्यात आला होता तसेच १९९२ साली विस्तारित गावठाण देण्यात आले असून या जागेवर रेल्वे विभागाने हक्क दाखवून रेल्वे विभागाच्या हद्दीच्या अंतिम हद्दी दर्शविणाऱ्या खुणा केल्या आहेत. संबंधित हद्दीसंदर्भात सत्यता पडताळणी झाली नसल्याने ग्रामस्थांमध्ये संभ्रम कायम असून काही ग्रामस्थांना नव्याने घराचे बांधकाम करण्यास अडथळे निर्माण झाले आहेत. त्या अनुषंगाने ग्रामपंचायतीच्यावतीने रेल्वे विभागाकडे संबंधित जागेत नव्याने घराचे बांधकाम करताना रेल्वे विभागाच्या हद्दीपासून किती अंतरावर बांधकाम करावे, याबाबतची लेखी मार्गदर्शक नियमावली ग्रामपंचायतींकडे सादर करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. संबंधित नियमावली लवकरच सादर करण्यात येईल, असे आश्वासन मिरज रेल्वे स्टेशनचे सहाय्यक अभियंता श्रवणकुमार भिल्ल यांनी दिले आहे.