सोळशीत २७ पासून राज्यस्तरीय साहित्य संमेलन
By Admin | Updated: November 18, 2015 00:04 IST2015-11-17T22:20:19+5:302015-11-18T00:04:01+5:30
नेत्यांची उपस्थिती : पृथ्वीराज चव्हाण उद्घाटक तर शरद पवारांच्या हस्ते सांगता

सोळशीत २७ पासून राज्यस्तरीय साहित्य संमेलन
सातारा : सोळशी (ता. कोरेगाव) येथे दि. २७ ते २९ नोव्हेंबर या कालावधीत राज्यस्तरीय साहित्य संमेलन होणार असून, ग्रामीण भागातील साहित्यिक, कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे हा यामागील उद्देश असल्याची माहिती स्वागताध्यक्ष बाळासाहेब सोळस्कर, निमंत्रक गोविंद गांधी आणि सोळशी देवस्थानचे पीठाधिपती शिवयोगी नंदगिरी महाराज यांनी दिली.
शनिवार, दि. २८ रोजी संमेलनाचे औपचारिक उद्घाटन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते आणि विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. संमेलनाध्यक्षपदी राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त लेखक जगन्नाथ शिंदे असतील. रविवार दि. २९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा अमृत महोत्सवानिमित्त सत्कार करण्यात येणार असून, त्यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या सांगता समारंभास खासदार उदयनराजे भोसले, विजयसिंह मोहिते-पाटील, माजी खासदार लक्ष्मणराव पाटील, प्रतापराव भोसले यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. (प्रतिनिधी)