औंध येथील राज्यस्तरीय भजन स्पर्धा रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:05 IST2021-02-05T09:05:24+5:302021-02-05T09:05:24+5:30

औंध : येथे गेल्या वीस वर्षांपासून होणारी राज्यस्तरीय संगीत-भजन स्पर्धा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली आहे, यंदा ...

State level bhajan competition at Aundh canceled | औंध येथील राज्यस्तरीय भजन स्पर्धा रद्द

औंध येथील राज्यस्तरीय भजन स्पर्धा रद्द

औंध : येथे गेल्या वीस वर्षांपासून होणारी राज्यस्तरीय संगीत-भजन स्पर्धा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली आहे, यंदा मंगळवारी २ फेब्रुवारी रोजी ही स्पर्धा होती, मात्र कोरोनाच्या महामारीमुळे रद्द करण्यात आली आहे, अशी माहिती आयोजक श्यामपुरी महाराज यांनी दिली.

औंध येथे हिरापुरी महाराज यांच्या पुण्यस्मरणानिमित्त प्रतिवर्षी राज्यस्तरीय भजन स्पर्धेचे आयोजित केला जाते. मात्र यंदा कोरोनाच्या प्रादुर्भाव व प्रशासनाच्या सूचनेनुसार संगीत भजन स्पर्धा रद्द करण्यात आली. या स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून रसिक येत असतात. त्यामुळे २ फेब्रुवारीला घेण्यात येणारी संगीत भजन स्पर्धा कोरोनामुळे रद्द करण्यात आली आहे, अशी माहिती श्यामपुरी महाराज यांनी दिली.

Web Title: State level bhajan competition at Aundh canceled