पेन्शन योजनेची माहिती राज्य शासनाने द्यावी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:39 IST2021-04-27T04:39:57+5:302021-04-27T04:39:57+5:30

अमोल जाधव यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, जिल्ह्यात अंशदायी पेन्शन योजनेतील बारा शासकीय कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असून या ...

State government should provide information about pension scheme! | पेन्शन योजनेची माहिती राज्य शासनाने द्यावी!

पेन्शन योजनेची माहिती राज्य शासनाने द्यावी!

अमोल जाधव यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, जिल्ह्यात अंशदायी पेन्शन योजनेतील बारा शासकीय कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असून या बारापैकी कोणत्याही कुटुंबाला शासकीय लाभ मिळालेला नाही. त्यामुळे ही योजना नेमकी कोणासाठी आहे, त्याचा खुलासा प्रशासनाने करावा. जर योजनेतील लाभ शासकीय कर्मचाऱ्यांना मिळत नसेल तर ती योजना काय कामाची? शासन नव्याने अंशदायी पेन्शन योजनेत बदल करून राष्ट्रीय पेन्शन योजनेत कर्मचाºयांना समाविष्ट करणार आहे. त्यामुळे योजनेविषयी पूर्ण माहिती आणि जुना हिशेब दिल्याशिवाय जिल्ह्यातील कोणताही सदस्य या योजनेत सहभागी होणार नाही, असा इशारा जिल्हा संघटना कार्यकारी सदस्य विक्रम शेरकर यांनी दिला आहे.

दरम्यान, पाटण तालुका जुनी पेन्शनधारक संघटनेचे शिलेदार असलेले शिक्षक श्रीराम रणसिंग यांचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना आधार देण्यासाठी संघटनेच्यावतीने ३ लाख ३२ हजार रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला. यावेळी जुनी पेन्शन हक्क संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल जाधव, प्रवीण तरटे, अविनाश करपे, विक्रम शेरकर, पाटण तालुका अध्यक्ष ओमकार पवार, कऱ्हाड तालुका अध्यक्ष चव्हाण, विनायक चव्हाण, महेंद्र जानुगडे उपस्थित होते.

Web Title: State government should provide information about pension scheme!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.