राज्य स्पर्धेमध्ये आकांक्षाला सुवर्ण तर सुशांतला रौप्यपदक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:38 IST2021-01-20T04:38:36+5:302021-01-20T04:38:36+5:30
वाई : भोसरी, पुणे येथे सुरू असलेल्या राज्य मैदानी निवड चाचणी स्पर्धेत मांढरदेव येथील अॅथलेटिक्स फाऊंडेशनच्या आकांक्षा शेलार हिने ...

राज्य स्पर्धेमध्ये आकांक्षाला सुवर्ण तर सुशांतला रौप्यपदक
वाई : भोसरी, पुणे येथे सुरू असलेल्या राज्य मैदानी निवड चाचणी स्पर्धेत मांढरदेव येथील अॅथलेटिक्स फाऊंडेशनच्या आकांक्षा शेलार हिने वीस वर्षांखालील मुलींच्या गटात पाच हजार मीटर धावणे स्पर्धेत प्रथम तर सुशांत जेधे याने वीस वर्षांखालील मुलांच्या गटात दहा हजार मीटर धावणे या स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळविला.
पुणे येथील श्री संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल भोसरी येथे या स्पर्धा पार पडल्या. राज्य मैदानी निवड चाचणी स्पर्धेत सातारा जिल्ह्याबरोबर राज्यातील तीस जिल्ह्यांनी सहभाग नोंदविला आहे. या दोघांनी जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करताना हे यश मिळविले. सुशांत व आकांक्षा हे दोघेही भोपाळ व गुवाहाटी येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. हे दोघेही मांढरदेव येथील अॅथलेटिक्स सेंटरमध्ये सराव करतात. त्यांना क्रीडा प्रशिक्षक राजगुरू कोचळे व धोंडीराम वाडकर यांचे मार्गदर्शन लाभले.
यशाबद्दल सातारा जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशनचे अध्यक्ष पांडुरंग शिंदे, जिल्हा क्रीडाधिकारी युवराज नाईक यांनी कौतुक केले.