फलटण : फलटण येथे 'वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय' स्थापन करण्याच्या प्रस्तावाला राज्य शासनाच्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. यासाठी आवश्यक असलेली नवीन पदे निर्माण करणे आणि त्यासाठीच्या खर्चाच्या तरतुदीसही मान्यता देण्यात आली आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे फलटणच्या जनतेला व वकिलांना मोठा फायदा होणार असून, अनेक प्रकरणांसाठी सातारा येथे जावे लागणारे हेलपाटे आता थांबणार आहेत.फलटण येथे सध्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय व कनिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय अशी दोन न्यायालये कार्यरत आहेत. नागरिकांच्या सोयीसाठी फलटण येथे वरिष्ठस्तर दिवाणी न्यायालयाची स्थापना करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने मंजुरी दिलेली आहे. वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय फलटण येथे स्थापन व्हावे, यासाठी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सातत्याने मागणी केली होती. विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे त्यांनी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता.गतवर्षीच रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पाठपुराव्यामुळे फलटण येथे जिल्हा न्यायालय सुरू करण्यात आले होते. त्यानंतर आता वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय देखील मंजूर झाल्याने, फलटणच्या न्यायिक क्षेत्रात मोठी सोय उपलब्ध झाली आहे.
Web Summary : Phaltan will get a senior civil court, approved by the state cabinet. This decision, pushed by ex-MP Ranjeetsingh Naik Nimbalkar, saves citizens trips to Satara. A district court was established last year.
Web Summary : फलटण को राज्य मंत्रिमंडल द्वारा स्वीकृत एक वरिष्ठ दीवानी न्यायालय मिलेगा। पूर्व सांसद रणजीतसिंह नाइक निंबालकर द्वारा किए गए इस निर्णय से नागरिकों को सतारा की यात्रा करने से बचाया जा सकेगा। पिछले साल एक जिला न्यायालय स्थापित किया गया था।