शिक्षक पात्रतेसाठी अर्ज भरण्यास उद्यापासून प्रारंभ

By Admin | Updated: September 29, 2014 23:58 IST2014-09-29T23:57:27+5:302014-09-29T23:58:36+5:30

सातारा : शिक्षक पात्रता परीक्षा दि. १४ डिसेंबरला होणार असून,

Starting from tomorrow to fill the application for teacher qualification | शिक्षक पात्रतेसाठी अर्ज भरण्यास उद्यापासून प्रारंभ

शिक्षक पात्रतेसाठी अर्ज भरण्यास उद्यापासून प्रारंभ

सातारा : शिक्षक पात्रता परीक्षा दि. १४ डिसेंबरला होणार असून, त्यासाठी दि. १ आॅक्टोबरपासून आॅनलाईन अर्ज भरण्यास प्रारंभ होणार आहे.
याबाबत माहिती अशी की, पहिली ते पाचवी, सहावी ते आठवीसाठी सर्व व्यवस्थापने, मंडळे, सर्व माध्यमे, अनुदानित, विनाअनुदानित, कायम विना अनुदानित शाळांमध्ये शिक्षणसेवक पदावर नियुक्तीसाठी शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक केले आहे. याविषयी माहिती े२ूीस्र४ल्ली.्रल्ल या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या परीक्षेसाठी आॅनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया दि. १ ते २१ आॅक्टोबर या कालावधीत सुरू राहणार आहे. आॅनलाईन अर्ज भरणे व परीक्षेसंबंधी सर्व माहिती परिषदेच्या े२ूीस्र४ल्ली.्रल्ल आणि ेंँं३ी३.्रल्ल या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, अर्ज स्वीकारण्यासाठी जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीच्या कार्यालयात कक्ष स्थापन केले आहेत, अशीही माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
अनुदानित किंवा विनाअनुदानित संस्थांमध्ये शिक्षण सेवक म्हणून काम करण्यासाठी शिक्षक पात्रता परिक्षा अनिवार्य केली आहे. त्यामुळे त्या परिसरात जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे लक्ष लागून राहिले होते. (प्रतिनिधी)

Web Title: Starting from tomorrow to fill the application for teacher qualification