पाण्याचा टँकर सुरू करा, अन्यथा रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 05:03 IST2021-05-05T05:03:45+5:302021-05-05T05:03:45+5:30
दहिवडी : ‘पांगरी (ता. माण) या गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. तरी या गावात पिण्याच्या पाण्याचा टँकर ...

पाण्याचा टँकर सुरू करा, अन्यथा रास्ता रोको
दहिवडी : ‘पांगरी (ता. माण) या गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. तरी या गावात पिण्याच्या पाण्याचा टँकर सुरू करण्यात यावा अन्यथा बुधवारी (दि. ५) सकाळी अकरा वाजता फलटण-दहिवडी रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल,’ असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
याबाबतचे तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, पांगरी गावात पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई जाणवत आहे. या अनुशंगाने पांगरी ग्रामपंचायतीच्यावतीने टँकर सुरू करण्यासाठी ३ एप्रिलला माण पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाकडे प्रस्ताव देण्यात आला होता. संबंधितांनी पांगरी गावाला भेट देऊन हातपंपाला पाणी असल्याचे पाहिले; मात्र या पंपांना सध्या कसलेही पाणी नाही. त्यामुळे समस्थ ग्रामस्थांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे.
तसेच गावातील एकाच पंपाला पाणी असल्याने त्या ठिकाणी ग्रामस्थांची गर्दी होत आहे. त्यामुळे या कोरोनाच्या कालावधीत रुग्णांमध्ये वाढ होत आहे. तरी पांगरी गावात तातडीने पाण्याचा टँकर सुरू करण्यात यावा, अन्यथा बुधवारी सकाळी अकरा वाजता फलटण दहिवडी रस्त्यावरील पांगरी स्टंडवर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल.’
निवेदन सरपंच दिलीपराव आवळे, माजी सरपंच डॉ. अजित दडस यांनी दिले आहे.