शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

माळरानावर काळ्या सोन्याचा थर, नेरमधील गाळ काढणे सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 13:23 IST

खटाव तालुक्यातील महत्त्वपूर्ण असणाऱ्या नेर तलावातील गाळ काढण्याचे काम निवृत्त सैनिकांच्या पुढाकाराने आणि पुण्यातील ग्रीन थंब संस्थेच्या माध्यमातून सुरू झाले आहे. शेतकऱ्यांना हा गाळ मोफत देण्यात येणार असून, यामुळे माळराने पिकाऊ होणार असून, पाणीसाठाही वाढणार आहे.

ठळक मुद्देमाळरानावर काळ्या सोन्याचा थर, नेरमधील गाळ काढणे सुरू शेतकऱ्यांना मोफत वाटप; पाणीसाठा वाढणार, निवृत्त सैनिकांचा पुढाकार

पुसेगाव : खटाव तालुक्यातील महत्त्वपूर्ण असणाऱ्या नेर तलावातील गाळ काढण्याचे काम निवृत्त सैनिकांच्या पुढाकाराने आणि पुण्यातील ग्रीन थंब संस्थेच्या माध्यमातून सुरू झाले आहे. शेतकऱ्यांना हा गाळ मोफत देण्यात येणार असून, यामुळे माळराने पिकाऊ होणार असून, पाणीसाठाही वाढणार आहे.नेर तलाव हा व्हिक्टोरिया राणीच्या काळात बांधण्यात आलेला आहे. या तलावाला मोठा जलाशय लाभला असून, या तलावातील पाण्यावर परिसरातील अनेक गावांची शेती अवलंबून आहे. तसेच खटाव तालुक्यातील काही गावांची तहानही हा तलाव भागवतो.

दुष्काळी भागात असणाऱ्या या तलाव्यात चांगला पाणीसाठा झाला तरच फायदा होतो. अन्यथा टंचाईला सामोरे जावे लागते. त्यातच या तलावात गाळाचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात आहे. पुण्यातील ग्रीन थंब संस्थेचे अध्यक्ष व निवृत्त कर्नल सुरेश पाटील यांच्या माध्यमातून या तलावातील गाळ काढण्याचे काम दोन वर्षांपूर्वी सुरू झाले होते. मात्र, काही कारणास्तव ते थांबले होते; पण पुन्हा एकदा हे काम सुरू झाले आहे.नेर तलाव परिसरात आता लोकसहभाग आणि काही संस्थेच्या सहकार्यातून गाळ काढणे सुरू झाले आहे. या तलाव्यात मोठ्या प्रमाणात गाळ असून, तो काढण्याने दुहेरी फायदा होणार आहे. शेतकरी तो माळरानावर टाकून बागायती क्षेत्र करतील तसेच तलावातील पाणीसाठाही वाढणार आहे.

सध्या काढलेला गाळ शेतकरी डंपरमधून नेऊन शेतात टाकत आहेत. हा गाळ शेतकऱ्यांना मोफत देण्यात येत आहे. यामुळे माळरानावर काळ्या सोन्याचा थर दिसू लागला आहे.निवृत्त कर्नल शिवाजीराव घाडगे यांच्या हस्ते गाळ काढण्याच्या कामाचा प्रारंभ झाला.

यावेळी निवृत्त कर्नल सुरेश पाटील, कालवा निरीक्षक ए. पी. लेंभे, नेरच्या सरपंच विद्या देशमुख, वर्धनगडचे सरपंच अर्जुन मोहिते, पवारवाडीचे सरपंच महेश पवार, श्रीधर माने, कल्याण भोसले आदी उपस्थित होते. 

टॅग्स :DamधरणWaterपाणीSatara areaसातारा परिसर