शहरं
Join us  
Trending Stories
1
Mahayuti: एकनाथ शिंदे दिल्लीत, अजित पवार ‘वर्षा' बंगल्यावर, महायुतीत 'ऑल इज वेल'?
2
Ulhasnagar: पक्षांतर करणाऱ्यांच्या फोटोला आधी फासले काळे; नंतर सन्मानाने स्थान!
3
India- Israel: भारत-इस्रायलचे संबंध आणखी होणार वृद्धिंगत!
4
Andhra Pradesh: आंध्र प्रदेशात सात नक्षलवाद्यांचा खात्मा, ५० जणांना अटक; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त
5
Palghar: पालघरमध्ये शिक्षकाच्या मारहाणीला घाबरून मुलं लपली जंगलात, मग पुढं काय घडलं?
6
SC: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे का ढकलत नाहीत? न्यायालयाकडून राज्य सरकारला जाब
7
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
8
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
9
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
10
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
11
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
12
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
13
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
14
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
15
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
16
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
17
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
18
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
19
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
20
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
Daily Top 2Weekly Top 5

पुसेगावसह परिसरात नवीन आले लागवडीला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:27 IST

पुसेगाव : उत्तर खटाव तालुक्यातील मोळ, डिस्कळ बुध, पुसेगाव परिसरात गेल्या दोन आठवड्यांत वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने शेतीच्या ...

पुसेगाव : उत्तर खटाव तालुक्यातील मोळ, डिस्कळ बुध, पुसेगाव परिसरात गेल्या दोन आठवड्यांत वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने शेतीच्या कामांना वेग आला आहे. वातावरणात चांगलाच गारवा निर्माण झाल्याने शेतकऱ्यांनी आले लागवड उरकत आणली आहे. मात्र, गतवर्षी लावलेल्या आल्याच्या खोडवा पिकाचा दर दिवसेंदिवस ढासळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

बटाटा बियाणे तसचे बटाटा उत्पादनाची पुसेगाव ही मुख्य बाजारपेठ असून, गेल्या आठ-दहा वर्षांत या परिसरात आले या प्रचंड भांडवली पिकाची लागवड मोठ्या प्रमाणावर होत आहे. यावर्षी आले पिकाला दर नसल्याने बियाणेही स्वस्तात मिळाले. गेल्यावर्षी सुमारे ३२ हजार ५०० रुपये प्रतिगाडी (म्हणजे ५ क्विंटल) अशा दराने मिळणारे आले बियाणे यावर्षी प्रतिगाडी केवळ सात ते आठ हजार रुपयांत मिळाले. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावेळी आल्याची कमी प्रमाणात लागवड झाल्याचे दिसून येत आहे. सातत्याने लॉकडाऊन राहिल्याने शेतकऱ्यांना आपला शेतीमाल विकता आला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. जरी बियाणे कमी दराने मिळत असले तरी रासायनिकबरोबरच सेंद्रिय खतांच्या वाढलेल्या किमती, मजुरांनी वाढवलेले दर यामुळे शेतकऱ्यांना आले लागवडीसाठी कसरत करावी लागत आहे.

गतवर्षी लागवड केलेल्या आल्याला (दिडीचे आले) यंदाही कोरोनाच्या संकटाने ग्रासले आहे. लाखो रुपये खर्च करून केवळ दहा ते बारा हजार रुपये शेतकऱ्यांच्या हातात पडत आहेत. कोरोनामुळे प्रमुख बाजारपेठा बंद असल्याने व्यापारी आले खरेदीसाठी नाखूश आहेत. त्यातही जर दर पाडून मागणी केली आणि एखाद्या शेतकऱ्याने दिडीचे आले काढले तर त्यात प्रतवारी केल्याने शेतकऱ्यांना खर्च केलेली रक्कम परत मिळत नाही, अशी अवस्था झाली आहे.

चाैकट..

दीड वर्षांपासून दरात घसरण...

सध्या एका गाडीचा (५०० किलो) खरेदी दर केवळ चार ते पाच हजार रुपये आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वेळोवेळी लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे गेल्या दीड वर्षांपासून आल्याच्या दरात घसरण होत आहे.

पुढील वर्षापर्यंत कोरोनाचे संकट कमी होऊन बाजारपेठा सुरळीत झाल्यास आल्याची मागणी वाढेल व दरातही चांगली सुधारणा होईल, या एकाच आशेवर शेतकऱ्यांनी पुसेगावसह परिसरामध्ये आल्याची लागवड केली आहे.

०२ पुसेगाव

फोटो-

पुसेगाव परिसरात आले पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात येत आहे. (छाया : केशव जाधव)