शहरं
Join us  
Trending Stories
1
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
2
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
3
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
4
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
5
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
6
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
7
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली
8
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
9
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
10
Panvel Crime News: प्रेमसंबंधातून जन्मलेल्या बाळाला फुटपाथवर फेकलं; २४ तासाच्या आत आरोपींना अटक
11
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
12
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील
13
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
14
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
15
चुका सुधारणार की मारच खात राहणार?
16
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
17
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
18
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
19
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
20
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू

साताऱ्यात मटका अड्ड्यांवर छापा, लाख ८२ हजारांचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 18:20 IST

सातारा : शहरात स्थानिक गुन्हे शाखा, सातारा शहर व शाहूपुरी पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत विविध ठिकाणी पाच मटका अड्ड्यांवर छापा टाकला. यात दहा जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून एक लाख ८२ हजार रुपयांच्या मुद्देमालासह जुगार साहित्य जप्त केले आहे.

ठळक मुद्देसाताऱ्यात मटका अड्ड्यांवर छापालाख ८२ हजारांचा मुद्देमाल जप्त

सातारा : शहरात स्थानिक गुन्हे शाखा, सातारा शहर व शाहूपुरी पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत विविध ठिकाणी पाच मटका अड्ड्यांवर छापा टाकला. यात दहा जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून एक लाख ८२ हजार रुपयांच्या मुद्देमालासह जुगार साहित्य जप्त केले आहे.याबाबत माहिती अशी की, पर्यवेक्षाधीन पोलीस अधीक्षक पवन बनसोडे, पर्यवेक्षाधीन उपअधीक्षक नंदा पाराजे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या नेतृत्वाखाली पथकाने सातारा शहरातील विविध ठिकाणच्या ५ जुगार व मटका अड्ड्यांवर छापा टाकला.

यामध्ये काळूबाई मंदिर, प्रतापसिंहनगर येथे छापा टाकून समीर सलीम कच्छी (वय ३६ रा. जगदिश्वर कॉलनी, मोळाचा ओढा, सातारा) यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून एक लाख १० हजार ७०५ रुपये रोख व जुगार साहित्य जप्त केले. सातारा-कोरेगाव रस्त्यावर कॅनॉलजवळील दूध डेअरीच्या आडोशाला छाटा टाकून मकरंद शांताराम शिंदे (२९, गुरुवार पेठ, सातारा) ताब्यात घेऊन त्याच्याकडून ३७ हजार ९०२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

वाढेफाटा येथे भंगार दुकानातून बाळकृष्ण दिनकर कणसे (५०, कोडोली) व समीर कच्छी (रा. मोळाचा ओढा) यांना ताब्यात घेऊन १५ हजार ३२१ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. रविवार पेठ मनाली हॉटेल शेजारी झाकीर हुसेन शेख (४६, कोरेगाव), अझरुद्दीन शबीर मणेर (वय ३२, शनिवार पेठ), सचिन सुपेकर यांना ताब्यात घेऊन २ हजार ४५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

लक्ष्मी टेकडी पाण्याची टाकी परिसरातून शंकर भीमराव छोत्रे (वय ३४, रा. शेंद्रे) सागर अशोक शिंदे (वय ३०, लक्ष्मी टेकडी), अरुण माने (रा. पाटखळमाथा, ता. सातारा) यांना ताब्यात घेऊन १६ हजार १२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrimeगुन्हा