एसटी कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य कौतुकास्पद : नागनाथ स्वामी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:38 IST2021-03-20T04:38:23+5:302021-03-20T04:38:23+5:30
वडूज : ‘कोरोनाच्या काळातील भयानक परिस्थितीत एसटीचे चक्र थांबते की काय? अशी भीती निर्माण झाली असताना एसटीने पुन्हा नव्या ...

एसटी कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य कौतुकास्पद : नागनाथ स्वामी
वडूज : ‘कोरोनाच्या काळातील भयानक परिस्थितीत एसटीचे चक्र थांबते की काय? अशी भीती निर्माण झाली असताना एसटीने पुन्हा नव्या जोमाने रस्त्यावर धाव घेतली आहे. यामध्ये एसटी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दाखविलेले मनोधैर्य कौतुकास्पद आहे,’ असे प्रतिपादन अखिल ग्राहक पंचायतीचे जिल्हा सचिव प्रा. नागनाथ स्वामी यांनी केले.
ग्राहक पंचायतीच्यावतीने वडूज आगारात आयोजित अधिकारी, चालक, वाहक व कर्मचाऱ्यांच्या सत्कारप्रसंगी ते बोलत होते. यावेळी वडूजच्या स्टँडचा प्रश्न ग्राहक पंचायतीने मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करावा, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली. कार्यक्रमास वाहतूक निरीक्षक गणेश राऊत, सहायक वाहतूक निरीक्षक पोपट सानप, वाहतूक नियंत्रक अजित पिसाळ, संतोष जाधव, प्रवीण कचरे, ग्राहक पंचायतीचे तालुकाध्यक्ष विद्याधर कुलकर्णी, बचाराम साबळे, मुन्ना मुल्ला व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे विद्याधर कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. बचाराम साबळे यांनी आभार मानले.
१९वडूज
फोटो : वडूज आगारातील अधिकारी, कर्मचारी यांचा सत्कार करताना गणेश राऊत, प्रा. नागनाथ स्वामी, विद्याधर कुलकर्णी, बचाराम साबळे, मुन्ना मुल्ला आदी उपस्थित होते. (छाया : शेखर जाधव )