गणवेशासाठी एसटी संघटनेचे चड्डी बनियन आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 15:00 IST2017-07-22T15:00:10+5:302017-07-22T15:00:10+5:30
चार वर्षांपासून गणवेशाच्या कापडाचे वाटप नाही

गणवेशासाठी एसटी संघटनेचे चड्डी बनियन आंदोलन
आॅनलाईन लोकमत
सातारा , दि. २२ : तीन चार वर्षांपासून गणवेशाच्या कापडाचे वाटप अद्याप कर्मचाऱ्यांना झाले नसल्याच्या निषेधार्थ व अन्य महत्वपूर्ण मागणीसाठी येथील महाराष्ट्र एस. टी. कामगार संघटनेच्यावतीने चक्क चड्डी बनियन आंदोलन करण्यात आले.
येथील महाराष्ट्र एस. टी. कामगार संघटनेच्या सदस्यांनी विभाग नियंत्रक कार्यालयसमोर गुरूवारी सकाळी हे अनोखे आंदोलन केले. प्रादेशिक सचिव शिवाजीराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली हे आंदोलन झाले. यावेळी ज्ञानेश्वर घोणे, हणमंत जाधव, सुनिल भिसे, प्रकाश कोकरे आदी सहभागी झाले होते.