एसटी चालकास हातोड्याने मारहाण

By Admin | Updated: January 21, 2015 23:56 IST2015-01-21T23:02:13+5:302015-01-21T23:56:31+5:30

चालक जखमी : बँक कर्मचाऱ्यासह तिघांना अटक

ST driver hammer hammer | एसटी चालकास हातोड्याने मारहाण

एसटी चालकास हातोड्याने मारहाण

परळी : राज्य परिवहन महामंडळाच्या सातारा-खडगांव या गाडीला पोगरवाडी फाट्याजवळ तिघांनी हातोड्यांनी मारहाण केली. ही घटना समजताच परळी तसेच परिसरातील जमावाने घटनास्थळी धाव घेऊन मारहाण करणाऱ्या तिघांना अटक केल्याशिवाय वाहतूक सुरू न करण्याचा निर्णय घेतला. तिघांना पोलिसांनी अटक केली. त्यानंतर त्यांची जामिनावर मुक्तताही झाली.
या घटनेनंतर सातारा तालुका पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल झाला आणि त्यांना अटक करण्यात आली. कृष्णत निकम, रामचंद्र बापू देशमुख आणि पवन रामचंद्र देशमुख अशी अटक झालेल्यांची नावे असून पिकअप चालक रामचंद्र आणि पवन पितापूत्र आहे तर निकम हा एका बँकेतील कर्मचारी असल्याचे समजते.
याबाबत घटनास्थळ आणि सातारा तालुका पोलीस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी की, सातारा आगारातील चालक सुरेश गायकवाड हे सातारा-खडगांव ही एसटी बस घेऊन साताराहून खडगावकडे निघाले होते. बुधवारी सकाळी साडेआठच्या दरम्यान पोगरवाडी फाट्यानजीक एसटी बस आली असता सातारच्या दिशेने निघालेल्या पिकअपने वाहन (एमएच ११ - बीटी ५५६) चालकाने एसटी बसला झासा दिला. यानंतरही ही पिकअप पुढे निघून गेली. मात्र, थोड्याचवेळात ही पिकअप पुन्हा मागे आली आणि एसटी बसला आडवी मारली. यावेळी पिकअप चालक रामचंद्र बापू देशमुख, कृष्णत निकम, पवन रामचंद्र देशमुख पिकअपमधून खाली उतरले आणि त्यांनी चालक सुरेश गायकवाड यांना गाडीतील हातोड्याने मारहाण केली.
हा प्रकार सुरू असतानाच मानेवाडी-अंबवडे खुर्द येथील काही युवकांना मारहाण करणाऱ्या तीन युवकांनी फोन करून घटनास्थळी बोलावले. याचवेळी गाडीत असणाऱ्या वाहक आणि काही प्रवाशांनी सोडविण्याचा प्रयत्न केला; परंतु युवकांनी त्यांनाही मारहाण केली. याचवेळी काही ग्रामस्थांनी फोनवरून ही घटना परळी ग्रामस्थांना कळविली. यानंतर परळी परिसरातील युवकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. यामुळे येथे वाहतुकीची मोठी कोंडी झाली. काही वेळानंतर पोलीस, एसटीचे अधिकारीही घटनास्थळी पोहोचले. ‘हल्लेखोरांना आमच्या ताब्यात द्या किंवा त्यांना तत्काळ अटक करा,’ असा पवित्रा घेतला. काही ग्रामस्थांनी रस्त्यावर ठिय्या मांडत वाहतूक थांबविली. यावेळी सातारा आगारव्यवस्थापक नीलम गिरी, सहायक पोलीस निरीक्षक हेमंत साठे, वाहतूक अधिकारी के. टी. पाटील, सहायक फौजदार शशिकांत फडतरे उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: ST driver hammer hammer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.