एसटी बस थेट उंब्रज बसस्थानकात
By Admin | Updated: December 2, 2014 23:21 IST2014-12-02T22:07:51+5:302014-12-02T23:21:48+5:30
परिसर गजबजला : व्यापाऱ्यांनी अतिक्रमणे काढली--लोकमतचादणका

एसटी बस थेट उंब्रज बसस्थानकात
उंब्रज : एसटी बस आता स्थानकात येऊ लागल्या आहेत. बसस्थानक परिसर गजबला आहे. आजही पोलिसांनी दंडात्मक कारवाई करवाई सुरू ठेवली असून ही कारवाई अशीच सुरू ठेवणार असल्याचे सांगितले. लोकमतने हा विषय हाताळल्याबद्दल ‘लोकमत’चे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
एसटी बसस्थानकात येण्याबाबत उंब्रजकरांनी राजकीय मतभेद विसरून या मोहिमेत सहभाग घेतला. यासाठी उंब्रज ग्रामपंचायतीने उपमार्गावरील अतिक्रमणे काढण्याबाबत नोटिसा दिल्या. यामुळे व्यापाऱ्यांनी उत्स्फुर्तपणे अतिक्रमणे काढून घेतली. कालपासून या मोहिमेस सुरुवात झाली.
उंब्रज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांनी कालपासून कडक धोरण राबवत उपमार्गावरील पार्किंग केलेल्या वाहनांवर कारवाई करण्यास सुरुवात केली. ही कारवाई अशीच कायम सुरू राहणार असल्याची त्यांनी ग्वाही दिली.
एसटी महामंडळानेही वाहकांना कडक सूचना दिल्यामुळे एसटी बसस्थानकात येऊ लागल्या आहेत. त्यामुळे महामार्गावरील प्रवाशांची गर्दी आपोआपच कमी कमी झाली असून गर्दीने फुलले आहे. (प्रतिनिधी)
‘लोकमत’ने हा विषय सकारात्मक दृष्टिकोनातून हाताळला. सर्वच बाजुंच्यावर लिखाण झाल्याने लोकजागृत झाली. व्यापाऱ्यांनीही या उपक्रमाला सहकार्य केले. हे वातावरण असेच कायम राहिले तर एसटी गाड्या कायमच बसस्थानकात येतील.
- उदय पाटील
हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांनी घेतलेली कडक भुमिका व ‘लोकमत’ने लेखमालिकेतून मांडलेली भुमिका कारणीभूत आहे. सर्वांच्या सहकार्यातून हा उपक्रम यशस्वी झाला आहे.
- चंदक्रांत जाधव