शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

Satara: सज्जनगड घाटात एसटीचा अपघात; चालकाच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2025 15:18 IST

घाटातील साईडपट्ट्या खचल्या

सातारा : सज्जनगडहून साताऱ्यात काॅलेजच्या मुलांना घेऊन येणाऱ्या एसटीचालकाचे अचानक घाटात नियंत्रण सुटले. चालकाने प्रसंगावधान राखून एसटी दरीच्या बाजूला न नेता डोंगराच्या बाजूला नेली. यामुळे मोठा अनर्थ टळला. हा अपघात गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजता सज्जनगड घाटात झाला.याबाबत पोलिसांनी सांगितले की, ठोसेघरहून एसटी गुरुवारी सकाळी साताऱ्याकडे येत होती. या एसटीमध्ये १० ते १५ महाविद्यालयीन मुले व मुली होती. एसटी सज्जनगड घाटात आल्यानंतर चालकाचे अचानक वळणावर नियंत्रण सुटले. चालकाने प्रसंगावधान राखून बस डाेंगराच्या बाजूला खोल खड्ड्यात घातली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. घाटात एसटीचा अपघात झाल्याचे समजताच कारी गावातील अजय आढागळे, जीवन शिंदे, बापू मोरे तसेच गजवडी, सोनवडी गावांतील युवकांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेतली. काॅलेजच्या मुलांना एसटीतून सुखरूप बाहेर काढले. यामध्ये कोणीही जखमी झाले नाही. या अपघाताची सातारा तालुका पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत नोंद झाली नव्हती.घाटातील साईडपट्ट्या खचल्यासज्जनगड घाटातील साईडपट्ट्या खचल्या आहेत. या साईडपट्ट्यांचा अंदाज न आल्याने हा अपघात झाला असावा, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. जिथे हा अपघात झाला. तेथून पुढे खोल दरी होती. त्यामुळे एसटीतील मुले भयभीत झाली होती.