घोरपडीची शिकार; तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:07 IST2021-01-08T06:07:10+5:302021-01-08T06:07:10+5:30

पांढरेवाडी - वजरोशी येथील विनोद घाडगे नामक व्यक्तीने मौजे फडतरवाडी (घोट) येथे शिकार करून आणलेल्या मृत घोरपडीचे फोटो सोशल ...

Squirrel hunting; Three arrested | घोरपडीची शिकार; तिघांना अटक

घोरपडीची शिकार; तिघांना अटक

पांढरेवाडी - वजरोशी येथील विनोद घाडगे नामक व्यक्तीने मौजे फडतरवाडी (घोट) येथे शिकार करून आणलेल्या मृत घोरपडीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले होते. याची माहिती मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांना मिळाली. त्यावरून पाटणचे वनक्षेत्रपाल विलास काळे, ढोरोशीचे वनपाल अशोक राऊत, वनरक्षक रवींद्र कदम, वनरक्षक अरविंद जाधव व इतर दोन व्यक्ती यांनी सापळा रचून फडतरवाडी (घोट) येथून विनोद घाडगे या व्यक्तीस चौकशीसाठी ताब्यात घेतले.

दरम्यान, चौकशीअंती वन्यप्राण्याची शिकार केलेल्या भाऊ गंगाराम साळुंखे, गणपत मारुती साळुंखे, सिधु गणपत साळुंखे यांना ताब्यात घेऊन गणपत मारुती साळुंखे यांच्या राहत्या घरात घोरपडीचे शिजविलेले मटन ताब्यात घेतले. अल्युमिनियमचे पातेले, कोयता व लाकडी ठोकळा इतर साहित्य जप्त केले.

Web Title: Squirrel hunting; Three arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.