पत्नीला पेटविणाऱ्याच्या शोधासाठी पथके रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:41 IST2021-09-03T04:41:42+5:302021-09-03T04:41:42+5:30
महाबळेश्वर : चारित्र्याच्या संशयावरून घोडे व्यावसायिक राजेंद्र उर्फ राजू महादेव जाधव (वय ५५, रा. स्कूल मोहल्ला) याने पत्नी बायना ...

पत्नीला पेटविणाऱ्याच्या शोधासाठी पथके रवाना
महाबळेश्वर : चारित्र्याच्या संशयावरून घोडे व्यावसायिक राजेंद्र उर्फ राजू महादेव जाधव (वय ५५, रा. स्कूल मोहल्ला) याने पत्नी बायना जाधव हिच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. यामध्ये पत्नी गंभीर जखमी झाली. या महिलेस ग्रामीण रुग्णालय महाबळेश्वर येथे प्राथमिक उपचारानंतर सातारा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या घटनेनंतर महिलेचा पती राजेंद्र जाधव हा पळून गेला आहे. सातारा येथे या महिलेची भेट उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. शीतल जानवे-खराडे यांनी घेत प्रकृतीची विचारपूस केली. वाईच्या उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. शीतल जानवे-खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली फरार राजेंद्र उर्फ राजू जाधव याच्या शोधासाठी महाबळेश्वर शहर व परिसरासह पाचगणी, वाई अशा ठिकठिकाणी पथके रवाना केली असून, पोलीस उपनिरीक्षक अब्दुल बिद्री, हवालदार श्रीकांत कांबळे, पप्पू काळे, मोहन क्षीरसागर, सर्जेराव कांबळे, मदन मुळे आदी पोलीस कर्मचाऱ्यांची टीम या नराधम पतीचा कसून शोध घेत आहे.