कार्वेत ग्रामपंचायतीकडून औषधांची फवारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:40 IST2021-09-03T04:40:43+5:302021-09-03T04:40:43+5:30

कार्वे : डेंग्यूसह चिकुनगुनिया साथ रोखण्यासाठी कार्वे (ता. कऱ्हाड) ग्रामपंचायतीने औषध फवारणी सुरू केली आहे. दूषित पाण्यामुळे सगळीकडे घाणीचे ...

Spraying of drugs from Karvet Gram Panchayat | कार्वेत ग्रामपंचायतीकडून औषधांची फवारणी

कार्वेत ग्रामपंचायतीकडून औषधांची फवारणी

कार्वे : डेंग्यूसह चिकुनगुनिया साथ रोखण्यासाठी कार्वे (ता. कऱ्हाड) ग्रामपंचायतीने औषध फवारणी सुरू केली आहे. दूषित पाण्यामुळे सगळीकडे घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामळे डेंग्यू, चिकुनगुनिया साथ पसरत आहे. त्यामुळे उपाययोजना आखून कार्वे ग्रामपंचायतीने गावात कीटकनाशक फवारणी सुरू केली आहे. नदीला आलेल्या महापुराने पाणी दूषित झाले होते. हे पाणी निर्जंतुक करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. नाले, रस्त्यांची स्वच्छता करण्यात येत आहे. सरपंच संदीप भांबुरे यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य त्यासाठी प्रयत्नशील आहेत.

एसजीएम कॉलेजमध्ये ग्रंथपाल दिन उत्साहात

कऱ्हाड : येथील गाडगे महाराज महाविद्यालयात पद्मश्री डॉ. एस. आर. रंगनाथन जयंतीनिमित्त ग्रंथपाल दिन साजरा करण्यात आला. प्राचार्य डॉ. मोहन राजमाने यांच्या हस्ते प्रतिमा पूजन झाले. केशवराव पवार मध्यवर्ती ग्रंथालयातर्फे ‘ग्रंथ आपले दारी’ उपक्रमांतर्गत ग्रंथरथाचे आयोजन करण्यात आले. यावेळी उपप्राचार्य प्रा. पाटील, माधुरी कांबळे, प्रा. नेताजी सूर्यवंशी उपस्थित होते. ग्रंथपाल महेश गायकवाड, उपग्रंथपाल राजेंद्र गरुड यांच्यासह कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.

तळबीडच्या ताराबाई विद्यालयाला ध्वज प्रदान

कऱ्हाड : तळबीड (ता. कऱ्हाड) येथील महाराणी ताराबाई विद्यालयाच्या एनसीसी युनिटला राष्ट्रीय कॅडेट कोर ग्रुप मुख्यालय, पुणे शाळेच्या ग्रुप कमांडर ब्रिगेडियर लिमये यांच्या हस्ते ध्वज प्रदान करण्यात आला. हा ध्वज पंचक्रोशी शिक्षण मंडळाच्या अध्यक्ष चित्राताई कदम-माने यांनी महाराणी ताराबाई विद्यालयाच्यावतीने सन्मानाने स्वीकारला. यावेळी ब्रिगेडियर आर. के. गायकवाड, ग्रुप कॅप्टन आर. एस. जाधव, विक्रमसिंह मोहिते, चित्राताई माने, जयवंतराव मोहिते उपस्थित होते. विक्रमसिंह मोहिते यांनी शालेय कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी मुख्याध्यापक सलीम ढालाईत, ज्ञानेश्वर कोळी, राजकुमार मोहिते यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. सरपंच जयवंत मोहिते यांनी प्रास्ताविक करून आभार मानले.

ग्रामीण भागात कोरोना नियमांचे सर्रास उल्लंघन

कऱ्हाड : गत महिनाभरापासून तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. त्याचवेळी प्रशासनाकडून नियमांचे पालन करण्याचे आवाहनही नागरिकांना करण्यात आले आहे. मात्र, असे असले तरी ग्रामीण भागात नागरिकांकडून प्रशासनाच्या सूचनांचे खुलेआम उल्लंघन सुरू आहे. तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी अद्यापही तालुका कोरोनामुक्त झालेला नाही. मार्च महिन्यापासून जुलैपर्यंत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तालुक्याला मोठा फटका बसला आहे. आता गणेशोत्सव तोंडावर आला असून, नियम न पाळल्यास पुन्हा एकदा सर्वांना मोठी किंमत मोजावी लागू शकते.

Web Title: Spraying of drugs from Karvet Gram Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.