ठसकेबाज लावणीच्या तालावर सखी थिरकल्या

By Admin | Updated: March 15, 2016 00:34 IST2016-03-14T22:06:42+5:302016-03-15T00:34:32+5:30

हाऊसफुल शो : शिट्ट्या, टाळ्या अन् वन्समोअरने उत्तरोत्तर रंगला कार्यक्रम..

Spooky swinging on the lock of the packaging | ठसकेबाज लावणीच्या तालावर सखी थिरकल्या

ठसकेबाज लावणीच्या तालावर सखी थिरकल्या

 फलटण : ढोलकीच्या तालावरील ठेका, भन्नाट गाणी, शिट्ट्यांची व टाळ्यांची जोरदार बरसात, गर्दीचा पाऊस, धमाल नृत्य अशा वातावरणात ‘अप्सरा आली’ हा लावणी शो पार पडला. निमित्त होते लोकमत सखी मंच, फलटणतर्फे आयोजित अर्चना सावंत यांचा अप्सरा आली या लावणी शो कार्यक्रमाचे.
‘लोकमत सखी मंच’ फलटणच्या वतीने यावर्षीच्या नवीन सभासदांसाठी वर्षातील पहिल्या अर्चना सावंत यांच्या अप्सरा लावणी शोचे आयोजन राजलक्ष्मी लॉन्सवर करण्यात आले होते. नवीन नोंदणीला जसा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला तसा उत्स्फूर्त प्रतिसाद लावणी शोला होता. कार्यक्रमाच्या दोन तास आधीपासून महिलांनी रांगा लावल्या होत्या.
प्रारंभी लोकमतचे संस्थापक दिवंगत जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर स्वराज इंडिया इंडस्ट्रीज लि., च्या कार्यकारी संचालिका अ‍ॅड. जिजामाला नाईक-निंबाळकर, मंदाकिनी नाईक-निंबाळकर, आयुर आॅरगॅनिक अ‍ॅग्रो प्रॉडक्ट कंपनीच्या कार्यकारी संचालिका जयश्री आगवणे, कुंदा रुद्रभटे, इरावती मुळीक, वैशाली मठपती, रूपाली कुमठेकर, प्रिया दोशी, रूपाली जाधव, कविता शहा, वनीता चव्हाण, शीला जगताप, असिफा शिकलगार, धनश्री जगताप, मनीषा फलके, सुनंदा रणवरे, वर्षा सूर्यवंशी, हॉटेल रघुनंदनचे संदीप यादव उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात ‘पार्वतीच्या बाळा’ या भक्तिगीताने झाली. ‘या रावजी, बसा भावजी’ लावणीने सखींना ठेका धरायला लावला. ना
की डोळी छान, कुण्या गावचं आलं पाखरू, कैरी पाडाची, पिंजरा चित्रपटातील लावण्या सखींनी डोक्यावर घेतल्या. चोरीचा मामला मामाही थांबला, पिंगा ग पोरी पिंगा, शिट्टी वाजली, शांताबाई, रिक्षावाला, दादा कोंडकेची गाणी या गाण्यांनीही धम्माल उडवली. सखींना स्वराज इंडिया इंडस्ट्रीजतर्फे अ‍ॅड. जिजामाला नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते वाणाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमात स्वराज इंडिया इंडस्ट्रीजतर्फे तीन प्रॉडक्ट कीट, जान्हवी ब्युटी पार्लरतर्फे एका सखीला मोफत गोल्ड फेशियल, लक्ष्मी ब्युटी पार्लरतर्फे दोन सखींना हेअर स्पा, कास हॉलिडेजतर्फे एका सखीला हॉटेलचे फॅमिली पॅकेज, आयुर आॅरगॅनिक अ‍ॅग्रो प्रॉडक्ट कंपनीतर्फे एक सोन्याची नथ, साची ब्युटी पार्लरतर्फे पाच सखींना मशीन ट्रीटमेंट फेशियल हे लकी ड्रॉ काढण्यात आले. (प्रतिनिधी)

सखींनी धरला ठेका
महिलांनी महिलांसाठी आयोजित केलेल्या हा खास लावणी शो बघायला सखींनी भलतीच गर्दी केली होती. लावणीला सुरूवात झाल्यानंतर अनेक सखींनी स्टेजवर येऊन कलाकरांबरोबर लावणीच्या गाण्यावर ठेका धरला तर काहींनी जागेवर बसून आपल्यातील नृत्यकला दाखविली. बेधुंद होवून नाचणाऱ्या सखी पाहून कलाकारांना स्फुरण चढले. प्रत्येक गाण्याला शिट्ट्यांची व टाळ्यांची बरसात झाली.

Web Title: Spooky swinging on the lock of the packaging

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.