शिक्षण मंडळाच्या चित्रप्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:23 IST2021-09-02T05:23:25+5:302021-09-02T05:23:25+5:30

येथील शिक्षण मंडळ संचलित ‘संस्कृतिका’च्या वतीने संस्कृत दिन व कालिदास दिनाच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्ताने हे चित्रप्रदर्शन ...

Spontaneous response to the Board of Education's painting exhibition | शिक्षण मंडळाच्या चित्रप्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

शिक्षण मंडळाच्या चित्रप्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

येथील शिक्षण मंडळ संचलित ‘संस्कृतिका’च्या वतीने संस्कृत दिन व कालिदास दिनाच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्ताने हे चित्रप्रदर्शन झाले.

संस्कृतिकाच्या वतीने संस्कृत दिन विविध उपक्रमांद्वारे साजरा करण्यात आला. संस्थेच्या चारही माध्यमिक शाखांतील विद्यार्थ्यांना पंचतंत्र व हितोपदेशातील कथा संस्कृतच्या तासाला सांगितल्या. यामुळे मुलांची मानसिक भूक पूर्णत्वास जाताना भावनिक प्रगल्भता आकारास आली.

‘संस्कृतिकेच्या’ समन्वयक माधुरी कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन शिक्षण मंडळाचे सचिव चंद्रशेखर देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कुलकर्णी, शिल्पा वाळिंबे, राजेंद्र लाटकर व सर्व शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते.

कोरोना नियमांचे काटेकोर पालन करत हे प्रदर्शन दोन दिवस खुले ठेवण्यात आले होते. अनेक संस्कृतप्रेमींनी भेट दिली. प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी संस्कृत शिक्षिका शुभांगी सामक, पल्लवी भोसले, गौरी कुलकर्णी, प्रांजली कुलकर्णी यांनी परिश्रम घेतले.

फोटो ३१संस्कृत

Web Title: Spontaneous response to the Board of Education's painting exhibition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.