रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:40 IST2021-05-21T04:40:56+5:302021-05-21T04:40:56+5:30
शासनाने १८ वर्षांवरील सर्वांना लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची सुरुवातही झाली आहे. लसीकरण झाल्यानंतर काही दिवस युवकांना रक्तदान ...

रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
शासनाने १८ वर्षांवरील सर्वांना लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची सुरुवातही झाली आहे. लसीकरण झाल्यानंतर काही दिवस युवकांना रक्तदान करता येत नाही. त्यामुळे रक्ताचा तुटवडा निर्माण होऊ शकतो. या सर्व समस्यांचा विचार करून हिंदू एकता आंदोलनचे जिल्हाप्रमुख विक्रम पावसकर यांच्या नेतृत्वाखाली व तालुकाध्यक्ष गणेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मोरणा विभागात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.
प्रशांत चोपदार, ओंकार प्रभाळे, सोमनाथ हिरवे, अतुल हिरवे, प्रसाद अवसरे, नरेन नाझरे, अक्षय हिरवे, प्रणील शिंदे, कल्पेश हिरवे, अथर्व हिरवे, शुभम नाझरे, अभिषेक हिरवे, महेश फुटाणे, यशराज हिरवे, नामदेव नाझरे, हेमंत फुटाणे, गौरव हिरवे, प्रणील प्रभाळे, नीलेश हिरवे, शुभम प्रभाळे, उदय प्रभाळे, वेदांत डांगे आदी यावेळी उपस्थित होते. शिबिरात युवकांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली.
फोटो : २०केआरडी०३
कॅप्शन : मोरणा विभागात आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराचे उद्घाटन हिंदू एकताचे तालुकाप्रमुख गणेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.