बॅँक ऑफ महाराष्ट्रच्या एमएसएमई कर्ज मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:35 IST2021-01-21T04:35:51+5:302021-01-21T04:35:51+5:30

सातारा : देशातील अग्रगण्य बॅँक ऑफ महाराष्ट्रतर्फे बुधवार, दि.२० रोजी आयोजित करण्यात आलेल्या एमएसएमई कर्ज मेळाव्यास ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ...

Spontaneous response to Bank of Maharashtra's MSME loan meet | बॅँक ऑफ महाराष्ट्रच्या एमएसएमई कर्ज मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

बॅँक ऑफ महाराष्ट्रच्या एमएसएमई कर्ज मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

सातारा : देशातील अग्रगण्य बॅँक ऑफ महाराष्ट्रतर्फे बुधवार, दि.२० रोजी आयोजित करण्यात आलेल्या एमएसएमई कर्ज मेळाव्यास ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

ग्राहकांना एकाच छताखाली उत्पादन, सेवा तसेच व्यापार क्षेत्रातील ग्राहकांच्या गरजेची सूक्ष्म, लघु व मध्यम (एमएसएमई) कर्जाची माहिती मिळावी, यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून मेळाव्याची सुरुवात झाली. बॅँकेच्या अंचल प्रबंधक अपर्णा जोगळेकर यांनी बॅँकेच्या उपक्रमाविषयी माहिती दिली, तसेच ग्राहकांनी बॅँकेच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

या मेळाव्यास ग्राहकांनी सुरक्षेच्या नियमांचे पालन करून मोठ्या संख्येने भेट दिली व बॅँकेच्या कर्ज योजनांची माहिती जाणून घेतली. यावेळी मास असोसिएशनचे अध्यक्ष उदय देशमुख, एस.बी. पवार आदी उपस्थित होते. मेळावा यशस्वी करण्यासाठी सुमित कुमार, शशिकांत गायकवाड यांच्यासह कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. (वा.प्र)

फोटो : २० बॅँक ऑफ महाराष्ट्र

साताऱ्यात बुधवारी पार पडलेल्या बॅँक ऑफ महाराष्ट्रच्या कर्ज मेळाव्याचा ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

Web Title: Spontaneous response to Bank of Maharashtra's MSME loan meet