शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

सापाला वाचविण्यासाठी वेग केला कमी, दुचाकीला टेम्पोची धडक; तिघे गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 12:26 IST

रस्त्यावरून जाणाऱ्या सापाला वाचविण्यासाठी दुचाकीचा वेग कमी केल्याने मागून येणाऱ्या टेम्पोची जोरदार धडक बसून झालेल्या भीषण अपघातात निवती पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी प्रदीप गोसावी यांच्यासह त्यांची पत्नी व मुलगी गंभीर जखमी झाले. जखमींना अधिक उपचारासाठी गोवा येथे हलविण्यात आले आहे. हा अपघात मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास माड्याचीवाडी येथे घडला.

ठळक मुद्दे दुचाकीला टेम्पोची धडक; तिघे गंभीर, माड्याचीवाडी येथील घटनानिवती पोलीस कर्मचारी अपघातात जखमी

कुडाळ : रस्त्यावरून जाणाऱ्या सापाला वाचविण्यासाठी दुचाकीचा वेग कमी केल्याने मागून येणाऱ्या टेम्पोची जोरदार धडक बसून झालेल्या भीषण अपघातात निवती पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी प्रदीप गोसावी यांच्यासह त्यांची पत्नी व मुलगी गंभीर जखमी झाले.जखमींना अधिक उपचारासाठी गोवा येथे हलविण्यात आले आहे. हा अपघात मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास माड्याचीवाडी येथे घडला.प्रदीप गोसावी हे गेल्या वर्षीपासून निवती पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. मंगळवारी सायंकाळी ते कुडाळहून निवती पोलीस ठाणे येथे दुचाकीने जात होते. त्यांच्याबरोबर पत्नी प्रेरणा व मुलगी जुई होती. माड्याचीवाडी हायस्कूल येथे रस्त्यावरून जाणाऱ्या सापाला वाचविण्यासाठी त्यांनी ब्रेक लावून दुचाकीचा वेग कमी केला.

या दरम्यान मागून आईस्क्रीम भरून जात असलेल्या टेम्पोची जोरदार धडक त्यांच्या दुचाकीला बसली. त्यामुळे प्रदीप गोसावी रस्त्यावर फेकले गेल तर त्यांची पत्नी व मुलगी दुचाकीबरोबर काही अंतर फरफटत गेले. या अपघातात तिघेही गंभीर जखमी झाले.स्थानिक ग्रामस्थांनी सर्व जखमींना तत्काळ कुडाळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्रेरणा यांच्या डोक्याला व मानेला, जुईच्या हाताला, तर प्रदीप यांच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना अधिक उपचारासाठी गोवा येथे हलविण्यात आले. या अपघात प्रकरणी निवती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.गोसावी कुटुंबीयांची विचारपूस करण्यासाठी गर्दीप्रदीप गोसावी यांना अपघात झाल्याचे वृत्त समजताच कुडाळ व निवती पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी येथील ग्रामीण रुग्णालयात गर्दी केली होती. निवती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमोल साळुंखे यांनी रुग्णालयात धाव घेऊन जखमी गोसावी कुटुंबीयांची विचारपूस केली. तसेच अपघातस्थळाची पाहणी केली.

टॅग्स :Accidentअपघातsindhudurgसिंधुदुर्ग