लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : ग्रामपंचायत निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे निर्णय घेता येत नसल्याने जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची विशेष सभा शुक्रवारी होत आहे. या सभेत मार्चपूर्वी करण्यात येणाऱ्या कामांना प्रशासकीय मंजुरी देण्यात येणार आहे, असे सांगण्यात आले. तसेच याचवेळी जलव्यवस्थापन समिती सभाही होणार आहे.
जिल्हा परिषदेत ११ जानेवारीला स्थायी आणि जलव्यवस्थापन समितीची सभा झाली होती. मात्र, त्यावेळी जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूक सुरू होती. त्यामुळे आचारसंहिता लागू करण्यात आलेली. परिणामी या स्थायी समितीच्या सभेत काही विषयांवर चर्चा झाली. पण, निर्णय घेण्यात आला नव्हता. त्यामुळे २२ जानेवारीला स्थायी समितीची विशेष सभा घेण्याबाबत ठरविण्यात आले होते.
शुक्रवारी स्थायी समितीची विशेष सभा होत आहे. या सभेत मार्चपूर्वी करण्यात येणाऱ्या विविध कामांना प्रशासकीय मंजुरी देण्याचे ठरविण्यात आले आहे. तसेच इतर काही विषयांवरही चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे सांगण्यात आले.
....................................................
Web Title: Special meeting of ZP's standing committee today
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.