बैलांच्या मेकओव्हरसाठी खास सुपारी!
By Admin | Updated: July 7, 2017 15:16 IST2017-07-07T15:16:26+5:302017-07-07T15:16:26+5:30
टॅटूच्या डिझाईन काढण्याचा हंगामी व्यवसाय

बैलांच्या मेकओव्हरसाठी खास सुपारी!
आॅनलाईन लोकमत
मायणी (जि. सातारा), दि. ७: बळीराजाच्या खांद्याला खांदा लावुन काम करणाऱ्या बैलांना इतरांपेक्षा वेगळं वाटावं म्हणून त्यांचा मेकअप करणं जरा आॅड वाटतयं ना...? पण आजचा बळीराजा हायटेक होतोय. पारंपारिकतेला आधुनिकतेचं कोंदण देवुन आपली बैलजोडी हटके दिसावी यासाठी आता त्यांच्या मेकअपची सुपारी घेणारेही ग्रामीण भागात दिसु लागले आहेत.
लग्न समारंभातील वधुंचा मेकअप आणि त्याची किंमत हा कायम चचेर्चा विषय राहिला आहे. पण सध्या ग्रामीण भागात बेंदुर सणानिमित्त बैलांची सजावटही सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र ठरत आहे.
बैलांना खास शॅम्पुने आंघोळ घालून त्यांच्या अंगावर टॅटूच्या डिझाईन काढण्याचा हंगामी व्यवसाय गावागावांत सुरू झाला आहे. दोन हजार रूपयांपर्यंत बैल सजविण्यासाठी सुपारी ग्रामीण भागात दिल्या जात आहेत.