शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाची विशेष पोलिस महानिरीक्षकांनी केली पाहणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2023 16:36 IST

नसीर शिकलगार फलटण : श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा कालावधीमध्ये कायदा सुव्यवस्था रहावी तसेच वाहतूक सुरळीत रहावी या ...

नसीर शिकलगारफलटण : श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा कालावधीमध्ये कायदा सुव्यवस्था रहावी तसेच वाहतूक सुरळीत रहावी या दृष्टीने पोलिस प्रशासन काटेकोरपणे लक्ष देणार असल्याचे कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी सांगितले. फुलारी यांनी आज, सोमवार पालखी सोहळा मार्गाची पाहणी केली. यावेळी ते बोलत होते.विशेष पोलिस महानिरीक्षकांनी निरा दत्त घाट, लोणंद पालखीतळ, तरडगाव पालखीतळ, फलटण पालखी तळ व बरड पालखीतळ यांची आणि पालखी मार्गाची पाहणी केली. यावेळी जिल्हा पोलिस प्रमुख समीर शेख, अतिरिक्त जिल्हा पोलिस प्रमुख बापू बांगर, उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस, फलटण ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक धन्यकुमार गोडसे, फलटण नगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.सातारा जिल्ह्यात १८ जूनला श्री संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्याचे आगमन होणार आहे. या कालावधीत भाविकांना पायी चालताना कोणत्याही अडचणी येऊ नये तसेच वाहतूक व्यवस्था सुरळीत रहावी त्याचबरोबर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यादृष्टीने स्थानिक अधिकारी व पोलिसांशी आपण संवाद साधत असल्याचेही फुलारी यांनी सांगितले.पालखी सोहळा मार्गामध्ये कोणाला काही अडचणी आल्यास त्यांनी त्वरित पोलिस किंवा प्रशासनाची संपर्क साधण्यासाठी सर्व अधिकारी व पोलिसांचे मोबाईल नंबर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. पालखी काळात अनेक जण आकडे टाकून वीज घेत असतात त्यामुळे मोठी दुर्घटना घडू नये म्हणून महावितरणशीही चर्चा करणार असल्याचे फुलारी यांनी सांगितले

टॅग्स :Satara areaसातारा परिसर