कऱ्हाडच्या ओम एजन्सीत स्वातंत्र्यसैनिकांसह जवानांसाठी विशेष सुट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 04:19 IST2021-01-24T04:19:24+5:302021-01-24T04:19:24+5:30

मलकापूर : प्रजासत्ताक दिनानिमित्त स्वातंत्र्यसैनिक व सैन्य दलातील जवानांसाठी कोणत्याही खरेदीवर भव्य डिस्काऊंट व आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे. ...

Special discount for soldiers with freedom fighters at Om Agency in Karhad | कऱ्हाडच्या ओम एजन्सीत स्वातंत्र्यसैनिकांसह जवानांसाठी विशेष सुट

कऱ्हाडच्या ओम एजन्सीत स्वातंत्र्यसैनिकांसह जवानांसाठी विशेष सुट

मलकापूर : प्रजासत्ताक दिनानिमित्त स्वातंत्र्यसैनिक व सैन्य दलातील जवानांसाठी कोणत्याही खरेदीवर भव्य डिस्काऊंट व आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे. याशिवाय ऊर्जा आटा चक्कीवर १ हजार ५०० ते ४ हजार ५०० रुपयांपर्यंत भव्य डिस्काऊंट आॅफरही देण्यात आली आहे. या आॅफरचा ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन ओम एजन्सीचे मालक अजित सांडगे यांनी केले आहे.

अजित सांडगे म्हणाले, ऊर्जा आटा चक्की ही खास महाराष्ट्रीयन धान्यासाठी विकसित केलेली आहे. तसेच मजबूत बॉडी, हायजेनिक चेंबर, आकर्षक डिझाईनमध्ये विविध मॉडेल्स तयार केली आहेत. ओम एजन्सीने आत्तापर्यंत विक्री पश्चात विनम्र व तत्पर सेवा देऊन ग्राहकांमध्ये विश्वास संपादन केला आहे. तत्पर सेवा व सर्वगुण संपन्न उत्पादनामुळे ऊर्जा आटा चक्की ही परिसरात लोकप्रिय झाली आहे. या आटा चक्कीत ज्वारीचे व बाजरीचे पीठ अगदी महिलांना हवे तसे मिळते. तसेच गहू, तांदूळ, डाळी, मका, मसाल्याचे पदार्थ, साखर, सर्व भाजणी, औषधी पावडर, मेतकूट, दीपावलीच्या पदार्थांची पिठे, हळद, मिरची पावडर व जनावरांसाठी लागणारे सर्वप्रकारचे खाद्य या आटा चक्कीत करता येते.

प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध आकर्षक डिझाईनमध्ये १ एचपी, २ एचपी, आॅटो व मिनी आॅटो अशा सर्व मॉडेल्सवर ७ हजार ९९९ रुपयांपासून पुढे विविध मॉडेल्स हजर स्टॉकमध्ये उपलब्ध आहेत. या सर्वप्रकारच्या मॉडेल्सवर प्रजासत्ताक दिनानिमित्त १ हजार ५०० रुपयांपासून ४ हजार ५०० रुपयांपर्यंत भव्य डिस्काऊंट देण्यात आला आहे. त्याचबरोबर स्वातंत्र्यसैनिक व सैन्य दलातील जवानांप्रति विशेष आदर असल्याने त्यांना डिस्काऊंटबरोबरच आकर्षक भेटवस्तू देण्यात येत आहे. (वा. प्र.)

फोटो : २३केआरडी०५

Web Title: Special discount for soldiers with freedom fighters at Om Agency in Karhad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.