सखींसाठी खास मैफल ‘नातं तुझं माझं’

By Admin | Updated: April 10, 2015 00:28 IST2015-04-09T22:20:01+5:302015-04-10T00:28:54+5:30

११ ते १३ एप्रिल दरम्यान आयोजन

A special concert for buddies' | सखींसाठी खास मैफल ‘नातं तुझं माझं’

सखींसाठी खास मैफल ‘नातं तुझं माझं’

सातारा : ‘लोकमत सखी मंच’च्या फलटण येथील सदस्यांसाठी येत्या शनिवारी,दि. ११ एप्रिल रोजी दु. ३ वाजता अनंत मंगल कार्यालय, फलटण येथे प्रसिद्ध संगीतकार हर्षित अभिराज यांच्या ‘नातं तुझं माझं’ या मैफलीचं आयोजन करण्यात आले आहे.
दरम्यान, सातारच्या सखींसाठी हाच कार्यक्रम रविवार, दि. १२ एप्रिल रोजी सायंकाळी ४ वाजता शाहू कला मंदिरात तर सोमवार, दि. १३ एप्रिल रोजी सायंकाळी ४ वाजता वेणुताई चव्हाण नाट्यगृह, कऱ्हाड येथे आयोजित करण्यात आला आहे.
११ चित्रपट, १६ अल्बम्स आणि ३७५ पेक्षा अधिक कार्यक्रम यामधून रसिकांच्या मनामनात पोहोचलेले. ‘दूरच्या रानात आणि सोडा राया हा नाद खुळा,’ लावणी फेम संगीतकार गायक हर्षित अभिराज ‘लोकमत सखी मंच’च्या सदस्यांसाठी ही मैफल सादर करणार आहेत.
यात महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर लोकप्रिय झालेली आणि हर्षितनी स्वरबद्ध केलेली लोकप्रिय गाणी तसेच ज्येष्ठ संगीतकारांची अजरामर गाणीही सादर होणार आहेत. या कार्यक्रमाचं प्रसिद्ध निवेदक अभय गोखले हे सूत्रसंचालन करणार असून, गौरव महाराष्ट्राचा फेम राजेश्वरी पवार यांचाही या मैफलीत सहभाग असणार आहे.
कार्यक्रमात नेहमीप्रमाणेच लकी ड्रॉ काढण्यात येणार असून, फलटण विजेत्यांना जान्हवी ब्युटी पार्लरमार्फत दहा फेशियल्स, लक्ष्मी ब्युटी पार्लरमार्फत हेअर स्पा तर सातारा येथील सखींना एस. एस. एंटरप्राजेसमार्फत इस्त्री, कास हॉलिडेज रिसॉर्टमार्फत एक दिवसीय पॅकेज, इम्प्रेशन ब्युटी पार्लरमार्फत पाच फेशियल्स, सुर्वेज प्युअर नॉनव्हेजमार्फत दहा सखींना जेवण या सुविधा मोफत मिळणार आहेत.
तसेच कऱ्हाड येथील सखींना स्वर्ग ज्वेलर्समार्फत एक ग्रॅम सोन्याचा बँगल्स मिळणार आहेत. त्याचप्रमाणे आनंद कृषी पर्यटन केंद्रामार्फत सातारा, कऱ्हाड आणि फलटण येथील प्रत्येकी तीन भाग्यवान सखींना शिवार सहल मोफत दिली जाणार आहे. जास्तीत जास्त सखींनी कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन ‘लोकमत सखी मंच’मार्फत करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)

नादमधूर गीते असणाऱ्या या खास संगीत मैफलीचे प्रायोजकत्व आयुर्वेदातील नामांकित प्रकृती जियो फ्रेश, महिलांसाठी नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या जिजाऊ प्रतिष्ठान आणि डेंटल केअर सेंटरच्या डॉ. विश्वराज निकम यांनी स्वीकारले आहे.

Web Title: A special concert for buddies'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.