शहरं
Join us  
Trending Stories
1
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
2
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
3
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
4
Shubham Dubey : सरकारी नोकरीत रिजेक्टचा ठपका; मग एका रात्रीत 'करोडपती' होऊन तो IPL स्टार कसा बनला?
5
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
6
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
7
भ्रष्टाचाराची तक्रार केली, ग्राम प्रमुखाला जेव्हा कळलं तेव्हा झाला 'मोठ्ठा कांड'! काय घडलं?
8
Travel Tips: फिरण्याची आवड आहे पण खिशाला परवडत नाही? जगभ्रमंतीची 'अशी' फिटवा हौस 
9
Sandeepa Virk : "दिग्दर्शक रात्री खोलीत शिरला, केली घाणेरडी मागणी"; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
10
IMDb Play Trick: सावधान! IMDb वर मोफत चित्रपट पाहण्याचा 'हा' जुगाड पडू शकतो महागात!
11
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
12
विराटच्या खांद्याला खांदा लावून वर्ल्डकप जिंकला, आता IPL 2026 मध्ये करतोय पंचगिरी, कोण आहे 'हा' खेळाडू?
13
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
14
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
15
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
16
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
17
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
18
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
19
आलिशान गाडी अन् ५५ लाख, 'मॅडम कलेक्टर'चा पर्दाफाश; नोकरीच्या नावाखाली तरुणांना फसवलं
20
Watermelon Price: मुंबईतील 'त्या' घटनेनंतर कलिंगडाचे दर कोसळले, आता किती रुपयांना मिळतंय?
Daily Top 2Weekly Top 5

तावातावाचं बोलणं देतेय घरचा आहेर !

By admin | Updated: August 7, 2015 22:16 IST

-सातारा पालिकेतून

दत्ता यादव - सातारा -पालिका सभा म्हटलं की, अनेक नगरसेवक आज काय बोलायचं, याची तयारी करून येतात. आपल्या आघाडीचे काम कसे चोख सुरू आहे, हे पटवून देण्यासाठी सगळेचजण सभेत प्रयत्नशील असतात. तावातावाने बोलून आघाडीलाच घरचा आहेर कधी दिला, हेही त्यांच्या लक्षात येत नाही. सभेत कितीही आकांडतांडव केला तरी नेत्यांपुढे त्यांना नांगी टाकावीच लागते. गुरुवारी झालेल्या सभेमध्येही हीच परिस्थिती दिसून आली.अधूनमधून विरोधी पक्षनेते अ‍ॅड. बाळासाहेब बाबर यांची उपरोधिक टीका पालिकेच्या कारभाराचे वाभाडे काढते. सत्ताधाऱ्यांच्या वर्मावर बोट ठेवून ते मागचं सपाट न होता विकास व्हावा, ही भूमिका घेऊन बोलतात; परंतु त्यांचा एकट्यांचा आवाज सत्ताधाऱ्यांपुढे दबला जातो. तसं पाहिलं तर पालिकेची सभा नेहमी खेळीमेळीतच होते; परंतु सभेत निष्ठेचा विषय निघतो, किंवा उणीदुणी काढण्यात येतात, त्यावेळी अनेकांचा संयम सुटतो. सभेपूर्वी विषयपत्रिका तयार होत असते. यामध्ये कोणाचा विषय घालायचा, हे त्या विषयावर अवलंबून नसून तो विषय कोणाकडून आला आहे, याला महत्त्व दिले जात आहे. त्यामुळे सभेत बोलताना अनेक नगरसेवकांचा तोल जातो. मागच्या सभेत मंजूर झालेल्या विषयाची अंमलबजावणी झाली का? त्याचे काम योग्य रितीने झाले का? मंजूर योजनेला खर्च किती आला? त्या योजनेतील पैसे उरले का? याविषयी चक्कार शब्द कोणीच काढत नाही. केवळ मंजूर झालेला निधी आपापल्या वॉर्डात कसा खर्च होईल आणि सभेत तो कसा मंजूर करून घ्यायचा, एवढाच मुद्दा बहुतांश जणांचा असतो. एखादा विषय मंजूर झाला नाही, असे सभेमध्ये क्वचितच घडते. त्यामुळे एकजण पत्रिकेवरील विषय वाचत जाणार आणि एक-दोघेच मंजूर म्हणून कुठून कोपऱ्यातून आवाज देणार, अशा प्रकारे जर जनतेची कामे होत असतील, तर केवळ औपचारिकतेसाठी पालिकेची सभा बोलावली जातेय की काय, असे वाटण्यासारखी परिस्थिती प्रत्येकवेळी पालिकेच्या सभेमध्ये दिसून येते.बोलण्याच्या ओघामध्ये कोणी काहीही बोलून जातं. त्यावर काहीही निर्णय होत नाही. केवळ एक चर्चेचा मुद्दा म्हणूनच त्याकडे पाहिले जाते. त्यामुळे ही पालिकेची सभा एक औपचारिक न होता, त्याला विकासाची दिशा असावी, अशी जनतेची अपेक्षा आहे. अशी आहे शुल्करचनाप्रतिपर्यटक १० रुपयेप्रवेश शुल्कमोठा कॅमेरा१०० रुपयेघरगुती कॅमेरा५० रुपयेगाईड फी१०० रुपयेप्रतितास दुचाकी पार्किंग१० रुपयेचारचाकी पार्किंग४० रुपयेमिनीबस पार्किंग१०० रुपयेआरामबस पार्किंग१५० रुपये