तावातावाचं बोलणं देतेय घरचा आहेर !
By Admin | Updated: August 7, 2015 22:16 IST2015-08-07T22:16:28+5:302015-08-07T22:16:28+5:30
-सातारा पालिकेतून

तावातावाचं बोलणं देतेय घरचा आहेर !
दत्ता यादव - सातारा -पालिका सभा म्हटलं की, अनेक नगरसेवक आज काय बोलायचं, याची तयारी करून येतात. आपल्या आघाडीचे काम कसे चोख सुरू आहे, हे पटवून देण्यासाठी सगळेचजण सभेत प्रयत्नशील असतात. तावातावाने बोलून आघाडीलाच घरचा आहेर कधी दिला, हेही त्यांच्या लक्षात येत नाही. सभेत कितीही आकांडतांडव केला तरी नेत्यांपुढे त्यांना नांगी टाकावीच लागते. गुरुवारी झालेल्या सभेमध्येही हीच परिस्थिती दिसून आली.
अधूनमधून विरोधी पक्षनेते अॅड. बाळासाहेब बाबर यांची उपरोधिक टीका पालिकेच्या कारभाराचे वाभाडे काढते. सत्ताधाऱ्यांच्या वर्मावर बोट ठेवून ते मागचं सपाट न होता विकास व्हावा, ही भूमिका घेऊन बोलतात; परंतु त्यांचा एकट्यांचा आवाज सत्ताधाऱ्यांपुढे दबला जातो. तसं पाहिलं तर पालिकेची सभा नेहमी खेळीमेळीतच होते; परंतु सभेत निष्ठेचा विषय निघतो, किंवा उणीदुणी काढण्यात येतात, त्यावेळी अनेकांचा संयम सुटतो. सभेपूर्वी विषयपत्रिका तयार होत असते. यामध्ये कोणाचा विषय घालायचा, हे त्या विषयावर अवलंबून नसून तो विषय कोणाकडून आला आहे, याला महत्त्व दिले जात आहे. त्यामुळे सभेत बोलताना अनेक नगरसेवकांचा तोल जातो. मागच्या सभेत मंजूर झालेल्या विषयाची अंमलबजावणी झाली का? त्याचे काम योग्य रितीने झाले का? मंजूर योजनेला खर्च किती आला? त्या योजनेतील पैसे उरले का? याविषयी चक्कार शब्द कोणीच काढत नाही. केवळ मंजूर झालेला निधी आपापल्या वॉर्डात कसा खर्च होईल आणि सभेत तो कसा मंजूर करून घ्यायचा, एवढाच मुद्दा बहुतांश जणांचा असतो. एखादा विषय मंजूर झाला नाही, असे सभेमध्ये क्वचितच घडते. त्यामुळे एकजण पत्रिकेवरील विषय वाचत जाणार आणि एक-दोघेच मंजूर म्हणून कुठून कोपऱ्यातून आवाज देणार, अशा प्रकारे जर जनतेची कामे होत असतील, तर केवळ औपचारिकतेसाठी पालिकेची सभा बोलावली जातेय की काय, असे वाटण्यासारखी परिस्थिती प्रत्येकवेळी पालिकेच्या सभेमध्ये दिसून येते.
बोलण्याच्या ओघामध्ये कोणी काहीही बोलून जातं. त्यावर काहीही निर्णय होत नाही. केवळ एक चर्चेचा मुद्दा म्हणूनच त्याकडे पाहिले जाते. त्यामुळे ही पालिकेची सभा एक औपचारिक न होता, त्याला विकासाची दिशा असावी, अशी जनतेची अपेक्षा आहे.
अशी आहे शुल्करचना
प्रतिपर्यटक १० रुपये
प्रवेश शुल्क
मोठा कॅमेरा१०० रुपये
घरगुती कॅमेरा५० रुपये
गाईड फी१०० रुपये
प्रतितास
दुचाकी पार्किंग१० रुपये
चारचाकी पार्किंग४० रुपये
मिनीबस पार्किंग१०० रुपये
आरामबस पार्किंग१५० रुपये