शहरं
Join us  
Trending Stories
1
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
2
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात
3
१८ एकर जमिनीवर कब्जा करण्याचा डाव फसला; प्रियकरासोबत मिळून पतीला मधुचंद्राच्या रात्रीचं संपवलं, मग...
4
Jio BlackRock नं लाँच केले तीन म्युच्युअल फंड, सलग पाचव्या दिवशी शेअरमध्ये जोरदार तेजी
5
मराठीशी तडजोड चालणार नाही! राजकीय लेबलं लावू नका, याकडे संकट म्हणून पाहा; राज ठाकरेंनी ठणकावलं
6
जय मराठी! ५ जुलैला विजयी मेळावा होईल, पण तो कोणत्याही पक्षाचा नसेल; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
7
चॉकलेटच्या डब्यात लपवून आणले तब्बल १६ साप अन्...; मुंबई विमानतळावर प्रवाशाला पोलिसांनी घेतले ताब्यात!
8
भारतात राहण्यासाठी काहीही! ५ बांगलादेशी पुरुषांनी निवडला 'विचित्र' मार्ग, कसे सापडले पोलिसांच्या तावडीत?
9
पतीसमोरच पत्नीने प्रियकरासोबत लग्न केले; निळ्या ड्रमची धडकीच मनात भरली, पतीने उलगडलं रहस्य
10
घसरणीनंतर पुन्हा वाढले सोन्याचे दर... खरेदीची संधी गेली का? २४ कॅरेटचा आजचा भाव काय?
11
हिंदी सक्ती : "समिती कोणतीही असू दे, आता सक्ती विषय..."; उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारला इशारा 
12
Vastu Tips: श्रीमंतांसारखं आयुष्य जगायचं असेल, तर आजच करा 'हे' सात प्रभावी वास्तू उपाय!
13
ऐकावे ते नवलंच! एकटा दरोडेखोरांशी भिडला; कंबरेत गोळी घुसली, २ km पर्यंत कळालेही नाही...
14
रस्ते, मेट्रो, सिंचन, कुंभमेळा...सरकारने सादर केल्या 57 हजार 509 कोटींच्या पुरवणी मागण्या
15
'ChatGPT' ला हे प्रश्न विचारू नका, नाहीतर तुम्ही मोठ्या अडचणीत सापडू शकता
16
प्रेमात मिळाला धोका तेव्हा खासगी आयुष्यातील 'तो' व्हिडिओ केला लीक; क्रिकेटर अडकला होता वादात
17
अदानी ग्रीन एनर्जीचा ऐतिहासिक विक्रम! अक्षय ऊर्जा क्षेत्रात असं काम करणारी पहिलीच भारतीय कंपनी
18
सौरभ गोखले आणि अनुजा साठेला नकोय मूल, अभिनेत्री म्हणाली- "आम्हाला प्राणी जास्त आवडतात..."
19
मर्यादेपेक्षाही अधिक महाग होणार चांदी; रॉबर्ड कियोसाकी यांच्या दाव्यात किती तथ्य?
20
"मराठी बोला तुम्ही मराठी बोला...", मुंबईच्या लोकलमध्ये तरुणाईचा गजर, व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल!

बॅंकेतून बोलतोय, असे सांगून महिलेला लाखाचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:40 IST

सातारा : हॅलो, मी ॲक्‍सिस बॅंकेतून बोलतोय, असे सांगून क्रेडिट कार्डची लिमिट वाढविण्याच्या बहाण्याने साताऱ्यातील एका महिलेची ...

सातारा : हॅलो, मी ॲक्‍सिस बॅंकेतून बोलतोय, असे सांगून क्रेडिट कार्डची लिमिट वाढविण्याच्या बहाण्याने साताऱ्यातील एका महिलेची १ लाख ७ हजार ३५३ रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी तृप्ती प्रसन्न साळुंखे (रा. करंजे, सातारा) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी, साळुंखे यांच्या मोबाईलवर दि. १५ मार्चरोजी एका अनोळखी व्यक्तीचा फोन आला. समोरून बोलणाऱ्या व्यक्तीने ॲक्‍सिस बॅंकेतून बोलत असल्याचे सांगून, साळुंखे यांना त्यांच्या क्रेडिट कार्डचे लिमिट वाढविण्यासाठी तसेच साडेनऊ हजार रुपयांचे गिफ्ट देण्यासाठी फोन केल्याचे सांगितले. त्यावर साळुंखे यांनी विश्‍वास ठेवत त्याच्यासोबत संभाषण सुरू ठेवले असता, त्याने त्यांच्या क्रेडिट कार्डच्या नंबरचे शेवटचे चार अंक विचारून घेतले. त्यानंतर तक्रारदार यांच्या मोबाईलवर आलेला ओटीपी नंबर विचारून घेत, त्यांच्या क्रेडिट कार्डवरून दि. १५, १६, १८ मार्चरोजी एकूण तीनवेळा साळुंखे यांचे १ लाख ७ हजार ३५३ रुपये त्याच्या बॅंक खात्यावर वर्ग करून त्यांची फसवणूक केल्याचे समोर आले. पुढील तपास शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय पतंगे करत आहेत. जर कोणाला अशाप्रकारे फोन आले, तर त्यांना तुमच्या बॅंक खात्याबाबत अथवा वैयक्तिक कोणतीही माहिती न देण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक पतंगे यांनी केले आहे.