शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

सोन्या अन् रानू बनले सेवागिरीचे चॅम्पियन- : साताऱ्यासह अन्य जिल्ह्यांतील जनावरांचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2019 00:16 IST

श्री सेवागिरी महाराजांच्या ७१ व्या पुण्यस्मरणार्थ यात्रेनिमित्त पुसेगाव येथे झालेल्या जातिवंत खिलार जनावरांच्या प्रदर्शनात बैलांच्या निवडीत सोनके, ता. पंढरपूर येथील विठ्ठल बिचुकले यांच्या सोन्या

ठळक मुद्देपुसेगाव यात्रा

पुसेगाव : श्री सेवागिरी महाराजांच्या ७१ व्या पुण्यस्मरणार्थ यात्रेनिमित्त पुसेगाव येथे झालेल्या जातिवंत खिलार जनावरांच्या प्रदर्शनात बैलांच्या निवडीत सोनके, ता. पंढरपूर येथील विठ्ठल बिचुकले यांच्या सोन्या या चार दाती खोंडाची तर जावेद दिलार मुलाणी (गादेगाव, ता. पंढरपूर, जि. सोलापूर) यांच्या रानू या दोन दाती कालवडीची श्री सेवागिरी चॅम्पियन म्हणून निवड करण्यात आली.

मठाधिपती सुंदरगिरी महाराज, सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, विश्वस्त मोहनराव जाधव, रणधीर जाधव, प्रताप जाधव, योगेश देशमुख, सुरेशशेठ जाधव यांच्या हस्ते जातिवंत खिलार जनावरांच्या निवडीला प्रारंभ झाला. या स्पर्धेसाठी जिल्हा पशुसंवर्धन सहायक उपायुक्त डॉ. डॉ. देवेंद्र जाधव, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. डी. एस. माने, डॉ. इंगवले, डॉ. अनिल चपने, डॉ. प्रवीण अभंग, डॉ. शेलार, डॉ. डोईफोडे तसेच स्थानिक पंच विलासराव जाधव, शहाजी जाधव, दत्तात्रय देशमुख, वैभव जाधव, संदीप जाधव, राहुल जाधव यांनी काम पाहिले.

गाय व खोंड अशा स्वतंत्र गटातून निवड करण्यात आली. निवड झालेल्या पहिल्या तीन विजेत्या क्रमांकांच्या जनावर मालकांची नावे पुढीलप्रमाणे- (गाय वर्ग) आदत एक वर्षाखालील- अजय भोसरे, आप्पासो घाडगे, बंडीशेगाव, ता. पंढरपूर, ओंकार सुतार, ललगुण, उत्तेजनार्थ: रोहित वायदंडे, मणिकपेठ (मोहोळ). आदत एक वर्षावरील- अर्जुन शिंदे पाटखळ, नासिर शेख नवलेवाडी, समृद्धी गलांडे स्वरूपखानवाडी, उत्तेजनार्थ- महादेव इंगळे कवटाळे (पंढरपूर ).

दोन दाती गाय - जावेद मुलाणी गादेगाव (पंढरपूर), बाळासो मुळे, कवटाळे व शंकर गोरे कटगुण, चारदाती गाय - अभिजित जानकर कोर्टी, रोहित कदम मापरवाडी, सूरज आडेकर इचलकरंजी, सहा दाती गाय- सूर्यकांत गुरव, खातगुण, मारुती कारंडे, महीम व कार्तिक चव्हाण भुरकवडी. जुळीक गाय - विष्णू चव्हाण नेर, सूर्यकांत भोसले खातगुण व विकास जाधव पुसेगाव.

बैल वर्ग आदत एक वर्षाखालील खोंड- सूरज आडेकर इचलकरंजी, प्रताप झांजुर्णे तडवळे, शब्बीर सय्यद बुध, उत्तेजनार्थ : परवेज मुलाणी बुध. आदत एक वर्षावरील खोंड : विजय सुतार ललगुण, युवराज महाडिक टेंबू कºहाड, लक्ष्मण जाधव सिद्धेवाडी, उत्तेजनार्थ दत्तात्रय बंडगर महीम व शिवाजी घाडगे बंडीशेगाव. दोन दाती खोंड- रामचंद्र जाधव सिद्धेवाडी, वामन बंदपट्टे पंढरपूर, विलास कदम बोथे, उत्तेजनार्थ शिवाजी गायकवाड टाकळी शिकदर.

चार दाती खोंड विठ्ठल बिचुकले सोनके, शंकर जगदाळे चिलाईवाडी पंढरपूर, सहा दाती खोंड-मल्हारी हाके सोनके, महादेव घाडगे वरवडे, विठ्ठल बंडगर महीम, उत्तेजनार्थ सागर गोसावी शिंदेवाडी. कोसा खोंड एक वर्षाआतील- अतुल घाडगे ल्हासुर्णे, कोसा खोंड एक वर्षावरील लक्ष्मण जाधव पुसेगाव, आदित्य माने धकटवाडी, सुनित शिंदे कान्हापुरी पंढरपूर, उत्तेजनार्थ बबन माने. कोसा खोंड चार दाती- तुकाराम बंडगर महीम, दत्तात्रय जाधव खातगुण, योगेश लावंड खातगुण, उत्तेजनार्थ : भाऊसाहेब अजूर शिवनूरबेळगाव.पुसेगाव येथे जनावरांच्या निवडीप्रसंगी चॅम्पियन गाय व बैलासमवेत सुंदरगिरी महाराज, डॉ. सुरेश जाधव, मोहन जाधव, योगेश जाधव, बाळासाहेब जाधव, विकास जाधव, वैभव जाधव, शहाजी जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरcowगाय