सोनगाव फाटा ठरतोय अपघातांचा हॉटस्पॉट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:38 IST2021-03-20T04:38:29+5:302021-03-20T04:38:29+5:30
शेंद्रे : सातारा तालुक्यातील सातारा-आसनगाव रस्त्यावर असणारा सोनगाव फाटा हा अपघातांचा हॉटस्पॉट ठरत आहे. सोनगाव फाटा येथे तीन मार्गावरचे ...

सोनगाव फाटा ठरतोय अपघातांचा हॉटस्पॉट
शेंद्रे :
सातारा तालुक्यातील सातारा-आसनगाव रस्त्यावर असणारा सोनगाव फाटा हा अपघातांचा हॉटस्पॉट ठरत आहे. सोनगाव फाटा येथे तीन मार्गावरचे रस्ते एकत्र मिळत असल्याने या ठिकाणी अपघातांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या परिसरात मोठे सूचना फलक व झेब्रा क्रॉसिंग इत्यादींची उपाययोजना करावी अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांच्यावतीने करण्यात येत आहे.
सातारा-आसनगाव व बोगदा-शेंद्रे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. या रस्त्यावरच असणाऱ्या सोनगाव फाटा येथे व्यवसायिक गाळे व मंगल कार्यालय असल्यामुळे या परिसरात लोकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. परंतु या परिसरात तीन रस्ते एकत्र येत असल्यामुळे सातारामार्गे, शेंद्रे मार्गे व आसनगाव मार्गे येणारे वाहन सोनगाव फाटा या चौकात एकत्र येतात. परंतु या परिसरात तिन्हीही मार्गावर सूचना फलक व झेब्रा क्रॉसिंग किंवा गतिरोधक नसल्याने वाहनधारकांना पुढे चौकात रस्त्याचा अंदाज येत नसल्याने या परिसरात अपघातांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. तरी या परिसरात बांधकाम विभागाने याची दखल घेऊन योग्य ती उपाययोजना करावी अशी मागणी सोनगाव, शेळकेवाडी, कुमठे व आसनगाव परिसरातील ग्रामस्थ करीत आहेत.
चौकट
सोनगाव फाटा येथे तिन्ही रस्ते एकत्र येत असल्यामुळे वाहनधारकांना समोरून येणाऱ्या वाहनांचा अंदाज येत नाही. या परिसरात अपघातांचे प्रमाण वाढले आहे. तरी याची दखल प्रशासनाने घेऊन तत्काळ या परिसरात मोठे सूचना फलक किंवा झेब्रा क्रॉसिंग याची उपाययोजना करावी.
- श्रीधर मोरे,
सोनगाव ग्रामस्थ.
१९शेंद्रे
सोनगाव फाटा चौकात तिन्ही रस्ते एकत्र येत असल्यामुळे या परिसरात अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. (छाया : सागर नावडकर)