जिल्हा परिषद अध्यक्षपदी सोनवलकर

By Admin | Updated: September 22, 2014 00:48 IST2014-09-22T00:45:13+5:302014-09-22T00:48:33+5:30

उपाध्यक्षपदी रवी साळुंखे : राष्ट्रवादीत नाराजीनामा; नेत्यांवर सदस्यांची आगपाखड

Sonalakalkar presidents of Zilla Parishad | जिल्हा परिषद अध्यक्षपदी सोनवलकर

जिल्हा परिषद अध्यक्षपदी सोनवलकर

सातारा : जिल्हा परिषद अध्यक्षपदी फलटण तालुक्यातील कोळकी गटाचे सदस्य माणिकराव सोनवलकर तर उपाध्यक्षपदी कोडोली गटाचे सदस्य प्रदीप ऊर्फ रवी साळुंखे यांची बिनविरोध निवड झाली. दोघेही सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसचे असून, सोनवलकर हे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष रामराजे नाईक-निंबाळकर तर साळुंखे हे खासदार उदयनराजे भोसले समर्थक आहेत.
दरम्यान, या निवडीनंतर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी एकच जल्लोष करत फटाक्यांची आतषबाजी केली. फलटणहून आलेल्या कार्यकर्त्यांनी गजीनृत्य करत बेल-भंडाऱ्याची उधळण केली.
रविवारी (दि. २१) जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी सभागृहात जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अश्विन मुदगल, मुख्य कार्यकारी अधिकारी जी. श्रीकांत यांच्या उपस्थितीत या निवडी झाल्या.
दरम्यान, अध्यक्ष निवडीसाठी काँग्रेसकडून महादेव पोकळे, मीनाक्षी पोळ तर उपाध्यक्षपदासाठी अविनाश फाळके यांनी अर्ज दाखल केले होते.
विशेष म्हणजे, राष्ट्रवादीने डावलले म्हणून नाराज झालेल्या शिवाजीराव शिंदे यांनी अध्यक्षपदासाठी तर अमित कदम यांनी उपाध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केले होते. मात्र, या सर्वांनीच अर्ज मागे घेतल्यामुळे दोन्ही निवडी बिनविरोध झाल्याचे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अश्विन मुदगल यांनी जाहीर केले. (प्रतिनिधी)

Web Title: Sonalakalkar presidents of Zilla Parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.