शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
6
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
7
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
8
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
9
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
10
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
11
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
12
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
13
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
14
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
15
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
16
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
17
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

सोनके-करंजखोप ओढ्यावरील पूल गेला वाहून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 5:14 PM

सोनके-करंजखोप मार्गावर असलेल्या ओढ्यावरील पूल वाहून गेल्याने वाहतुकीला धोका निर्माण झाला आहे. या मार्गावरील एसटीच्या फेऱ्याही बंद झाल्याने ग्रामस्थांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

ठळक मुद्देएसटीच्या फेऱ्याही बंद झाल्याने ग्रामस्थांना अडचणींचा सामना सोनके-करंजखोप मार्गावर ठिकठिकाणी खड्डे वाहनधारकांना वाहन चालविताना तारेवरची कसरत

पिंपोडे बुद्रुुक, दि. २४ : सोनके-करंजखोप मार्गावर असलेल्या ओढ्यावरील पूल वाहून गेल्याने वाहतुकीला धोका निर्माण झाला आहे. या मार्गावरील एसटीच्या फेऱ्याही बंद झाल्याने ग्रामस्थांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

कोरेगाव तालुक्याच्या उत्तरेकडे असलेल्या सोनके-करंजखोप या गावांना जोडणारा तीन किलोमीटरचा मार्ग आहे. या मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून, वाहनधारकांना वाहन चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या परतीच्या पावसामुळे रस्त्याची अवस्था आणखीनच बिकट झाली आहे.

दरम्यान, या दोन्ही गावांना जोडणाऱ्या ओढ्यावरील पूल परतीच्या पावसात वाहून गेल्याने वाहतुकीस धोका निर्माण झाला आहे. दुचाकी व इतर लहान वाहने वगळता या मार्गावरील अवजड वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.

एसटीच्या फेऱ्याही रद्द करण्यात आल्याने ग्रामस्थांना खासगी वाहनांनी प्रवास करावा लागत आहे. बांधकाम विभागाच्या वतीने तातडीने या पुलाची दुरुस्ती करावी, अशी मागणी करंजखोप ग्रामस्थांमधून होत आहे. 

या पुलाच्या दुरुस्तीसाठी जिल्हा परिषदेच्या वतीने पूरहानी अंतर्गत पंचवीस लाखांच्या निधीची तरतूद केली आहे. पुढील आठवड्यात दुरुस्तीच्या कामास प्रत्यक्ष सुरुवात केली जाईल.

- संदीप धुमाळ, करंजखोप

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभागroad safetyरस्ते सुरक्षा