जीवघेण्या खड्ड्यांवरून ‘उड्डाण’ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 12:32 AM2017-10-24T00:32:40+5:302017-10-24T00:32:50+5:30

महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीचा म्हणून मान मिळविलेल्या व नाशिक शहरातून जाणाºया राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलाची खड्ड्यांमुळे चाळण झाली असून, त्यामुळे वाहनचालक त्रस्त झाले आहेत. एकीकडे उड्डाणपुलाखाली शहर सौंदर्याच्या नावे सुशोभीकरण सुरू असताना पुलावरून मात्र मार्गक्रमण करताना चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

'Flight' from deadly pits! | जीवघेण्या खड्ड्यांवरून ‘उड्डाण’ !

जीवघेण्या खड्ड्यांवरून ‘उड्डाण’ !

Next

नाशिक : महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीचा म्हणून मान मिळविलेल्या व नाशिक शहरातून जाणाºया राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलाची खड्ड्यांमुळे चाळण झाली असून, त्यामुळे वाहनचालक त्रस्त झाले आहेत. एकीकडे उड्डाणपुलाखाली शहर सौंदर्याच्या नावे सुशोभीकरण सुरू असताना पुलावरून मात्र मार्गक्रमण करताना चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. या पुलाच्या दुरुस्तीवरून राष्टÑवादी कॉँग्रेसने सत्ताधारी भाजपा सरकारला आरोपीच्या पिंजºयात उभे केले आहे.  मुंबई-आग्रा महामार्गाच्या चौपदरीकरणांतर्गत गोंदे ते पिंपळगाव या सुमारे ६० किलोमीटर अंतराच्या सहा पदरीकरणाचे काम संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या कार्यकाळात पूर्ण करण्यात आले. तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या पुढाकाराने नाशिक शहरातून जाणाºया या राष्टÑीय महामार्गाच्या उभारणीतून शहरांतर्गत वाहतूक विस्कळीत होऊ नये म्हणून प्रकाश पेट्रोलपंप ते थेट पंचवटीतील के. के. वाघ महाविद्यालयापर्यंत सुमारे ६ किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल उभारण्यात आला. तर गरवारे चौफुली, पाथर्डी फाटा, राणेनगर, लेखानगर, इंदिरानगर याठिकाणी लहान पूल उभारण्यात येऊन राष्टÑीय महामार्गावरील वाहतूक थेट मुंबईहून धुळ्याकडे तर धुळ्याकडून मुंबईकडे या उड्डाणपुलाच्या माध्यमातून काढण्यात आली. फेब्रुवारी २०१२ मध्ये या पुलाचे उद्घाटन करण्यात आल्यानंतर तो वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.
खड्ड्यांमुळे अपघातात वाढ
सर्वाधिक लांबीच्या उड्डाणपुलावर जागोजागी खड्डे पडले आहेत. काही खड्ड्यांची अवस्था तर अतिशय भयंकर आहे. वाहनचालकाने कितीही सुरक्षित वाहन हाकण्याचा प्रयत्न केला तरी, खड्ड्यात जाणे क्रमप्राप्त आहे. काही ठिकाणी तर पुलावरील सर्व डांबर वाहून गेले व सीमेंट तसेच पुलाच्या बांधणीतील लोखंडी सळ्या बाहेर आल्या आहेत. या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्यास त्याचा वाहनचालकांना अंदाज येत नसल्याने अपघाताला आमंत्रणही मिळाले आहे. लहान वाहनांचे खड्ड्यात आदळून टायर फुटण्याचे तसेच टायर बेंड होण्याचे प्रकारही घडू लागले आहेत.
पुलासाठी पिंपळगावला टोल नाका
नाशिककरांच्या सोयीसाठी त्याचबरोबर मुंबईहून धुळ्याकडे व धुळ्याकडून मुंबईकडे विनासायास वाहने जाण्यासाठी शहरात उभारण्यात आलेल्या सर्वाधिक लांबीच्या उड्डाणपुलासाठी पिंपळगाव बसवंत येथे टोलनाका ठेवण्यात आला आहे. या टोलनाक्यावर वाहनांकडून टोल वसुली केली जात असून, त्यातून या महामार्गाच्या उभारणीसाठी आलेला खर्च कंपनीकडून वसूल केला जात आहे. साधारणत: तीन वर्षे ज्या कंपनीकडून रस्त्याची उभारणी केली जाते त्यांच्याकडून रस्त्याची देखभाल, दुरुस्ती केली जात असल्याने एल एन्ड टी या कंपनीची आता जबाबदारी संपुष्टात आली आहे. त्यामुळेच या महामार्गाची दुरवस्था झाली आहे.
पावसामुळे दुरवस्था
इगतपुरी तालुक्यातील गोंदे ते पिंपळगाव बसवंतपर्यंत या महामार्गावर ठिकठिकाणी रस्त्याला खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी खड्ड्यांची अवस्था इतकी बिकट आहे की, खड्डे चुकविण्याच्या नादात लहान-मोठ्या अपघातांनाही निमंत्रण मिळत आहे. मध्यंतरी या महामार्गावर झालेल्या जीवघेण्या अपघातानंतर ठिकठिकाणी स्पीड ब्रेकर टाकण्यात आले, परंतु आता खड्ड्यांची अवस्थाच अशी झाली की, वाहनांच्या वेगावर नियंत्रणासाठी स्पीड ब्रेकरची गरजच राहिलेली नाही. यंदा सर्वाधिक पाऊस झाल्यामुळेच रस्त्याची अवस्था बिकट झाल्याचे राष्टÑीय महामार्ग प्राधिकरणाने मान्य केले आहे. या रस्त्यावरून अवजड वाहनांची संख्याही अधिक असल्याकारणानेदेखील रस्ता वारंवार नादुरुस्त होण्याचे आणखी एक कारण आहे.

Web Title: 'Flight' from deadly pits!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.